Type Here to Get Search Results !

मीटर कॅलिब्रेशनसाठी थोडेच दिवस शिल्लक, दिली मुदतवाढ; लवकर करून घ्या मीटर कॅलिब्रेशन

 

पुणे, दि. 12 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): रिक्षाचालकांना मीटर कॅलिब्रेशनसाठी (पुनःप्रमाणीकरण) 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) घेतला आहे.

भाडेवाढ आकारण्यासाठी रिक्षाचालकांना मीटर कॅलिब्रेशन बंधनकारक करण्यात आले होते. आरटीओने एक सप्टेंबर 2022 पासून रिक्षा भाडेवाढीला मंजुरी दिली होती. त्यानंतर रिक्षाचालकांना मीटर कॅलिब्रेशन करून तपासणी करून घेण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.

शहरात 82 हजार रिक्षा असल्यामुळे कॅलिब्रेशनसाठी 5 ठिकाणी सोय करण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत केवळ 60 टक्के रिक्षाचालकांनी कॅलिब्रेशन केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कॅलिब्रेशनला मुदतवाढ देण्याची मागणी केली जात होती. उर्वरित 40 टक्क्यांहून अधिक रिक्षांचे कॅलिब्रेशन न झाल्याने आरटीओकडून 31 जानेवारी 2023 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

बहुतांश रिक्षाचालक हे कॅलिब्रेशनसाठी आळंदी रस्ता येथील मैदानावर गर्दी करीत आहेत. कर्वेनगर येथील अलंकार पोलीस ठाण्यासमोर, आळंदी रस्ता येथील फुलेनगर चाचणी मैदान, रामटेकडी इंडस्ट्रिअल इस्टेट येथील इगलबर्ग कंपनी, दिवे (पासिंग वाहने) आणि खराडी येथील इयॉन आयटी पार्क ही शहरातील इतर ठिकाणे कॅलिब्रेशनसाठी निश्‍चित करण्यात आली आहेत.

‘रिक्षा चालकांनी एकाच ठिकाणी गर्दी करू नये. त्यांना जवळचे असलेल्या ठिकाणी त्यांनी कॅलिब्रेशनसाठी जावे,’ असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com   

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.