पुणे, दि. 4 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): बालेवाडी येथील साई चौक परिसरामध्ये अनेक महाविद्यालये, मुलींचे वसतिगृह आहेत. या परिसरामध्ये
तीन आठवड्यांमध्ये अश्लील चाळे करून महिलांची छेड काढण्याच्या तीन घटना घडल्या
आहेत.
बालेवाडी येथील साई चौक परिसरात
अनेक महाविद्यालये, शाळा आहेत. अभियांत्रिकी तसेच एमबीएची पदवी
घेण्यासाठी अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी परगावावरून येथे येत असल्याने हा परिसर
विद्यार्थ्यांनी गजबजलेला असतो. या भागात महाविद्यालय जास्त आहे. त्यामानाने
लोकवस्ती कमी आहे. येथे सकाळी मॉर्निंग वॉक, ओपन जिम वर
व्यायाम करण्यासाठी, तसेच आपल्या पाळीव कुत्र्यांना फिरवण्यासाठी
अनेक महिला, मुली फिरायला येत असतात , याचाच
फायदा घेत विक्षिप्त मनोवृत्तीचे लोक असे चाळे करुन महिलांची छेड काढण्याचे प्रकार
करतात.
या भागात राहणाऱ्या एका वसतीगृहातील
मुलीने एक व्यक्ती रात्रीच्या वेळी बालेवाडी रस्त्यावर तिच्या मनास लज्जा उत्पन्न
होईल अशा पद्धतीचे वर्तन करू छेड काढत असल्याचे सांगितले. तर त्यानंतर दोन तीन
दिवसांनी असाच प्रकार त्याच ठिकाणी घडला. एक व्यक्ती असाच प्रकार करून मुलीची छेड
काढात होता, यावेळी जवळचे तिचे कॉलेजचे मित्र असल्याने तिने लगेचच त्यांना बोलावून
घेतले. या विकृत माणसाला या मुलांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.
काही महिला मुली अशा
घटना घडल्या की समोर येऊन पोलिसांमध्ये तक्रार करतात, तर काही मात्र उगीच
बदनामी नको किंवा कशाला हवी आफत म्हणून कुठेही काहीच बोलत नाहीत. पुढे निघून
जातात. तरी असे प्रकार वाढत असल्याने पोलिसांनी याबाबतीत काहीतरी ठोस उपाययोजना
कराव्यात अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.
महिलेने नाव न छापण्याच्या
विनंतीवरून पुढील महिती दिली आहे. २४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास
एक महिला तिच्या कुत्र्याला फिरवण्यासाठी साई चौक परिसरातील एका महाविद्यालयाजवळ
गेली असता, एक व्यक्ती अचानक पँट काढुन तिच्या समोर उभा राहिला. या महिलेला काय करावे
काहीच सुचले नाही. त्यामुळे ती पटकन पुढे निघून गेली. मात्र ती पुन्हा परत येत
असताना हा मनुष्य ‘मॅडम, माझं ऐकून तरी घ्या’ अस म्हणत होता. यावेळी या महिलेने
पटकन मोबाईल मध्ये त्याचा फोटो काढून घेतला. हे त्याच्या लक्षात आल्यावर कुठे काही
बोलू नका, माझ करियर संपून जाईल अशी विनवणी करू लागला. ती महिला
तेथून निघून सरळ घरी गेली व सगळा प्रकार आपल्या पतीला सांगितला व पोलिसात तक्रार
करून या व्यक्तीचा फोटोही पोलिसांना दिला.
“महापालिकेने रस्त्यांवरची जिथे
पथदिवे नाहीत तेथे ते बसवावे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. पोलिसांकडून जनजागृतीचे
कार्यक्रम, तसेच गस्त वाढविण्याची आहे.” असे बाणेर, बालेवाडी,
औंधचे पुणे महिला मंडळाचे खजिनदार जयश्री बेंद्रे यांनी सांगितले.
तर चतुर्श्रुंगीपोलीस ठाण्याचे वरिष्ठ
पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे,”या प्रकरणात आरोपीवर गंभीर गुन्हा दाखल केला असून, आरोपीचे काही
फुटेज ताब्यात आले असून लवकरच आरोपीला ताब्यात घेतले जाईल.” असे म्हणाले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84