याचं
कारण म्हणजे मुंबईतील झवेरी बाजार (zaveri bazar,
Mumbai) परिसरात सोन्याच्या दागिन्यांवर बनावट हॉलमार्किंग (Fake
hallmarking) करणाऱ्या दोन छोट्या संस्थांवर छापे टाकण्यात आले. बनावट
हॉलमार्क केलेले दीड कोटीहून अधिक रकमेचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
मिळालेल्या
माहितीनुसार, एकूण 6 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या छापेमारीत 1.5 कोटी
रुपयांचे 2.75 किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलं आहे.
बनावट हॉलमार्किंग रोखण्यासाठी मानक ब्युरोकडून (standard bureau) सतत कारवाई केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना फसवण्याचं प्रमाण कमी होईल
आणि अशा बनावट होलमार्किंग करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश होईल यासाठी ही कारवाई
करण्यात आली.
भारतीय
मानक ब्युरोने नागपूर शहर, पुणे, मुंबई, ठाणे जिल्ह्यात
काही ठिकाणी छापे (raid) टाकून ही मोठी कारवाई केली. तुम्ही
जर दागिने खरेदी करत असाल तर तुम्ही होलमार्क तपासूनच करा नाहीतर तुमचीही फसवणूक
होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार हे छापे एकाच वेळी टाकण्यात आले.
सोनं
खरेदी करताना ग्राहकांना शुद्ध सोनं मिळावं यासाठी हॉलमार्क पद्धत अवलंबवण्यात
आली. मात्र या हॉलमार्कच्या नावाखालीच सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक सुरू
असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. मुंबई,
ठाणे, पुणे आणि नागपूर या मुख्य शहरांसह
महाराष्ट्रातील 6 ठिकाणी भारतीय मानक ब्युरोने एकाच वेळी
छापे टाकले.
BISप्रमाणे सुयोग्य चाचणी आणि गुणवत्ता तपासणी न करता, सोन्याच्या
दागिन्यांवर बनावट हॉलमार्क लावून ग्राहकांची फसवणूक करणार्या कंपन्यांविरुद्ध
कारवाई करण्यात आलीय. सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकृतींवर 16 जून 2021 पासून बीआयएस हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात
आलं आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84