पुणे, दि. 6 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): बालेवाडी येथील सिग्नेचर टॉवर येथे जाऊन बिल्डरकडून 29 लाख 25 हजारांची खंडणी उकळणार्या तसेच गृहप्रकल्पामध्ये थ्री बीएचके फ्लॅटची आणि 24 लाख रुपयांची बेकायदेशीर मागणी करणार्या चौघांवर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सौरभ संजय पाटील (रा. स्वप्न बंगला, स्वस्तिक कॉलनी, कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. चेतन सुभाष बालवडकर (35), सुभाष बालवडकर (33, रा. लक्ष्मीनगर, बालेवाडी), सागर वसंत बालवडकर (35, रा. गारमाळ, धायरी) आणि आदित्य दत्तात्रय हगवणे (33, रा. कोंढवा बुद्रुक, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ पाटील हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचा बालेवाडी येथे सिग्नेचर टॉवर नावाने प्रकल्प सुरू आहे. या इमारतीचे काम सुरू असून, या साईटवर आरोपींनी वेळोवेळी जाऊन विविध कारणे सांगून साईट बंद पाडण्याची व सोशल मीडियावर बदनामी करण्याची भीती दाखवली. तसेच पाटील यांच्याकडून रोख स्वरूपात 26 लाख 75 हजारांची, तर आरटीजीएसद्वारे 2 लाख 50 हजारांची खंडणी उकळली. याबरोबरच आणखी 24 लाख आणि बालेवाडी येथील गृहप्रकल्पामध्ये थ्री बीएचके फ्लॅटची मागणी केली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला
वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब
सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला
इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली
हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम
सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर
चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84