पुणे, दि. 20 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): गॅस संपल्यानंतर नवीन सिलेंडरला रेग्युलेटर अनेकदा बसत नाही. तेव्हा गॅस सिलेंडर वितरकाला फोन केल्यानंतर त्यांचा माणूस येऊन बसवून देतो. पण एका ज्येष्ठ नागरिक महिलेला सायबर चोरट्यांनी गंडा (Fraud Case) घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Cyber Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरातील गॅस सकाळी संपला. नवीन सिलेंडरला रेग्युलेटर बसत नव्हता. त्यामुळे त्यांनी गुगलवर एच पी कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर सर्च करुन त्यावर संपर्क केला. त्याला रेग्युलेटरबाबत सांगितल्याने त्याने मोबाईलवर क्वीक हेल्प अॅप डाऊनलोड करायला सांगितले. त्यामध्ये त्यांना सर्व माहिती भरायला सांगितली. त्याप्रमाणे त्यांनी बँकेसह सर्व माहिती भरली. त्यानंतर त्यांना त्या चोरट्याने 25 रुपये पाठविण्यास सांगितले.
ते पैसे पाठविल्यावर तंत्रज्ञ येऊन तुम्हाला काम करुन देईन, काही पैसे असेल तर ते सांगेल, असे सायबर चोरट्याने सांगितले. तेव्हा त्यांना अशा प्रकारे फसवणूक होत असल्याची लक्षात आले. त्याने हिंदीतूनच त्यांना अशी फसवणूक होत असल्याची आम्हाला माहिती आहे. तुम्हाला एच पीची 25 रुपयांची पावती मिळेल, असे सांगितल्यावर त्यांनी त्यांनी एकीकडे फोनवर बोलत असतानाच 25 रुपये ट्रान्सफर केले. त्या पाठोपाठ त्यांच्या मोबाईलवर एका पाठोपाठ मेसेज येण्यास सुरुवात झाली.
त्यांनी ते पाहिल्यावर आपली फसवणुक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने बँकेला फोन करुन बँक खाते गोठविण्यास सांगितले. तोपर्यंत सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून 5,73.807 रुपये काढून घेत संपूर्ण खाते रिकामे केले होते. हा प्रकार 4 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7:30 वाजता घडला. याप्रकरणी भांडारकर रोडवर राहणार्या या 64 वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक पठाण तपास करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84