Type Here to Get Search Results !

कोर्टाने दिले गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

 

पुणे, दि. 25 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): गौतमी पाटील (gautami patil) हे नाव आता महाराष्ट्राला नवं राहिलेलं नाही. लावणी क्वीन (lavni queen dancer gautami patil) म्हणून सध्या प्रसिद्ध असणारी गौतमी पाटील वेगवेगळ्या कारणांसाठी गाजते आहे. गौतमीच्या नृत्याचे जितके चाहते आहेत, तितकेच तिच्या सौंदर्यावर आणि फॅशनवर देखील फिदा आहेत.

मात्र, आपल्या नृत्यामुळे सर्वांना भुरळ घालणारी प्रसिद्ध लावणीकार गौतमी पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे. गौतमी पाटीलवर गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी वकिलांकडून (lawyers) करण्यात आली आहे (gautami patil case to be filed).  गौतमी पाटील हीच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर तिच्यावर टीका करण्यात आली होती. त्यावेळी गौतमी वर लावणी क्षेत्रातील अनेकांनी टीका केली (gautami patil critics) होती. त्यानंतर गौतमीने जाहीर माफी (apologized) मागितली होती.

गौतमी आपल्या कार्यक्रमात अश्लिल हावभाव (Obscene gestures) करते, लोकांना घाणेरडे हातवारे करते, शॉर्ट कपडे घालते हे असले प्रकार लोककलेत (folk art) व लावणीत (lavani)  येतच नाहीत. लावणीकडे बघण्याचा महिलांचा दृष्टीकोन बदलत असताना गौतमीने लावणीची संस्कृती (culture) जपावी. तिने लावणीच करावी अश्लीलपणा (obscenity) करू नये असं म्हणत तिच्यावर टीका करण्यात आली होती.

गौतमी पाटील अश्लील डान्स करत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. प्रतिभा शेलार (pratibha shelar) यांनी गौतमी पाटील हीच्या विरोधात तक्रार (complint) दाखल केल्यानंतर हा वाद सातारा कोर्टात (satara court) गेला होता. यावेळी सदर वकिलांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तिच्या अनेक कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांनी हैदोस घातला. त्यामुळे तिच्यावर टीका करण्यात आली होती.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84   

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.