पुणे, दि. 21 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): घटस्फोटाचा निकाल लागताच पतीला हृदयविकाराचा झटका आल्याची अचंबित करणारी घटना समोर आली आहे. ही घटना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या दिघी परिसरात घडली. (The husband suffered a heart attack in dighi as soon as the divorce was finalised.)
वृषभ मुकुंद जाधव
असे मयत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी आपल्या मुलावर अतिरिक्त दबाव टाकला त्यामुळे
त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यांनी दिघी पोलीस ठाण्यासमोर मृतदेह
ठेवला आणि त्यानंतर ठिय्या आंदोलन सुरू केले.
मिळालेल्या
माहितीनुसार, असून
पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दमदाटी केल्याचा आरोप मयत तरुणाच्या
कुटुंबीयांनी केलेला आहे. ऋषभ आणि त्याची पत्नी यांच्यात सतत भांडणे होत असल्याने
त्यांनी पत्नीच्या विरोधात घटस्फोटाची केस कोर्टात दाखल केली होती आणि हा निकाल
पत्नीच्या बाजूने लागला. पत्नीला घरी राहण्यास द्यायचे आणि पैसे द्यायचे असा
पर्याय न्यायालयाने वृषभ यांना सांगितला त्यानंतर ते घरी निघून आले.
काही वेळाने पत्नी तिच्या नातेवाईकांना घेऊन ऋषभ
यांच्या घरी आली त्यावेळी पत्नी आणि वृषभ यांच्यात पुन्हा भांडणे झाली त्यानंतर ऋषभ यांना
अस्वस्थ वाटू लागले आणि ते खाली कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यात
आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता.
घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी आपल्या मुलावर दबाव टाकला त्यामुळे त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असा आरोप करत नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात मृतदेह ठेवून दोषी व्यक्तींवर कारवाईची मागणी केली आहे.
जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल
असे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84