पुणे, दि. 20 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): प्रकृती अस्वस्थ्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणारे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांना रुग्णालयातून सोडण्यात आल्यानंतर त्यांनी थेट कसबा पेठेतील जनसंपर्क कार्यालय गाठले. (After reaching the public relations office directly from the hospital girish bapat started working.)
पुण्याच्या राजकारणावर छाप असलेले खासदार गिरीश बापट यांच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना श्वसनाचा त्रास असल्याचे सांगितले जात आहे. प्रकृती सुधारत असल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.
त्यानंतर रात्री त्यांनी कसबा पेठेतील जनसंपर्क कार्यालय गाठले. खासदार गिरीश बापट कार्यालयात आल्याचे समजताच कार्यकर्त्यांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. काही मिनिटातच हजारो कार्यकर्ते कार्यालयात उपस्थित होते. या सर्वांबरोबर बापट यांनी चर्चा केली. विशेष म्हणजे पूर्ण बरे वाटत नसतानाही बापट कार्यालयात उपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांकडूनही आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
बापट रुग्णालयात असल्याचे समजल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेकांनी बापट यांची रुग्णालयात जाऊन प्रकृतीची विचारपूस केली होती.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84