पुणे, दि. 12 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यातील कोंढवा परिसरात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 60 वर्षीय आजोबांनी आपल्याच 11 वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेबाबत संतापाची लाट पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही इयत्ता 4 थी मध्ये शिकत असून सध्या कोंढवा भागात एका शाळेतील शिक्षण घेत आहे. शाळेतील शिक्षक चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना ‘गुड टच, बॅड टच’ या विषयाची माहिती देत असतांना पिडित मुलीने डिसेंबर 2022 च्या महिन्यात तिच्या बरोबर घडलेला प्रकार शिक्षकांना सांगितला.
"जब घर मे कोई नही होता था तब मुझे दादाजी गोद मे बिठाते थे" असे सांगत या चिमुरडीने आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती शिक्षकांना दिली. मुलीने शिक्षकांना सांगितलं की, आजोबा आधी मला अश्लील व्हिडिओ दाखवायचे आणि यावरच ते थांबायचे नाही तर मी ओरडले तर ते माझे तोंड दाबून मला गप्प करायचे, असे देखील या पीडित मुलीने शिक्षकांना सांगितले.
घडलेल्या प्रकरणानंतर शिक्षकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर आरोपी विरोधात कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84