Type Here to Get Search Results !

अपघाताच्या बहाण्याने चोऱ्या करून दहशत माजविणाऱ्या टोळीतील एका महिलेसह चौघांवर मोक्का

 

पुणे, दि. 20 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): अपघाताच्या बहाण्याने चोऱ्या करून दहशत माजविणाऱ्या टोळीतील गुन्हेगार इरफान इस्माईल सय्यद आणि एका महिलेसह तीन साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याबाबत दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली. (Dattawadi police took Action under the Mokka Act against gangs who steal and terrorize on the pretext of an accident.)

टोळीप्रमुख इरफान इस्माईल सय्यद (वय 30 वर्षे, रा. कामठे वस्ती, माळवाडी, हडपसर) आणि त्याचे साथीदार शरद ऊर्फ डॅनी आहिरे, (वय 26, रा. म्हाळुंगे-नांदे, चांदे रोड), शंकर पकाले (वय 27, रा. लोणी काळभोर) आणि एक महिला अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा, जबरी चोरी, दहशत निर्माण करणे, दुखापत करणे असे गंभीर स्वरूरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 10 डिसेंबर 2022 रोजी फिर्यादी हे रात्री कामावरून घरी जात होते. या वेळी दोन दुचाकीवरून मागून आलेल्या आरोपींनी फिर्यादीला ‘तुझ्याकडून मागे दोन अपघात झाले आहेत. त्याचा खर्च 40 हजार रुपये न दिल्यास तुझा हात तोडून टाकू. तुझे आयुष्य उद्धवस्त करू’ अशी धमकी दिली. तसेच, फिर्यादीच्या बँक एटीएममधून जबरदस्तीने 40 हजार रुपये घेऊन त्याला जबर मारहाण केली.

याबाबत दत्तवाडीचे वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन यांनी पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे यांना मोक्काचा प्रस्ताव सादर केला होता. प्रकरणाची छाननी करून डहाळे यांनी मोक्काच्या प्रस्तावास मान्यता दिली. पुढील तपास सहायक आयुक्त सुनील पवार करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.