Type Here to Get Search Results !

‘हिंदकेसरी’ अभिजित कटकेचा संजय काकडेंच्या हस्ते सन्मान

 

पुणे, दि. 18 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): हिंदकेसरीचा किताब पटकावणार्‍या अभिजित कटके याचा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार संजय काकडे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी अभिजितला दीड किलो वजनाची चांदीची गदा भेट देण्यात आली. (Abhijit Katke, who won the 'Hindkesari' title, was publicly felicitated by BJP's state vice president and former MP Sanjay Kakde. A silver mace weighing one and a half kilos was presented to him.)

 

शहरातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात (dagadusheth halwai ganpati mandir) हिंदकेसरीअभिजित कटके याचा संजय काकडे यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी अभिजित कटकेची ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

 

या प्रसंगी माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी नगरसेवक शंकर पवार, राहुल भंडारे, धीरज घाटे, हेमंत रासने, योगेश समेळ, तुषार पाटील यांसह मान्यवर, पुणेकर नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

भारतीय शैली कुस्ती (kushti) महासंघाने हैदराबाद (hydrabad), तेलंगणा (telangana) येथे 51 वी अखिल भारतीय हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केली होती. या मानाच्या स्पर्धेत अभिजित कटके याने हिंदकेसरीचा किताब पटकवला. अंतिम सामन्यात पुण्याचा जिगरबाज कुस्तीपटू अभिजित कटके याने हरियाणाच्या सोमवीरवर विजय मिळवला.

 

अभिजित कटके याने हिंदकेसरीकिताब मिळवून त्याच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. त्याने यापूर्वी महाराष्ट्र केसरीचा किताब देखील पटकावला आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.