Type Here to Get Search Results !

पाकिस्तानात गुटख्याचा कारखाना, गोवा गुटखाचे मालक दोषी; माणिकचंद गुटखा मालकावरील खटला थांबवला

 


पुणे, दि. 11 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला पाकिस्तानात गुटख्याचा कारखाना सुरू करण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली गुटखा व्यापारी जे.एम. जोशी यांच्यासह जमिरुद्दीन अन्सारी आणि फारुख अन्सारी उर्फ फारुख तालका यांना दोषी ठरवलं आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दाऊदनं साल 2002 मध्ये पाकिस्तानात गुटखा उत्पादन सुरू करण्यासाठी या दोन्ही गुटखा मालकांकडे मदत मागितली होती. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, दाऊदच्या गुटखा उत्पादन कंपनीला 'फायर गुटखा कंपनी' असं संबोधलं जाणार होतं.

त्यावेळी जोशी यांनी सांगितल्याप्रमाणे सारी जबाबदारी घेऊन प्लांट कार्यान्वित करण्यासाठी 2 कोटी 64 लाख रुपये किंमतीची पाच मशीन दुबईमार्गे पाकिस्तानला पाठवली होती. मात्र, पुढे धारिवाल आणि जोशी यांच्यात पैशांवरून वाद झाला आणि जोशी यांनी गोवा गुटखा सुरू केला होता. अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रदिप घरत यांनी कोर्टाला दिली.

जोशी यांनी देशातील लाखो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि कोट्यवधी रुपयांचा महसूलही सरकारला मिळवून दिला होता. तसेच त्यांची इतर कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही त्यामुळे त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती जोशी यांच्यावतीने अँड. सुदीप पासबोला यांनी केली. मात्र, जोशींच्याविरोधात दाखल गुन्हे हे गंभीर स्वरुपाचे असून जोशींना जीवाची भीती वाटत होती तर त्यांनी दाऊदऐवजी पोलिसांकडे मदत मागणं अपेक्षित होतं. असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला. त्यांची ही बाजू ग्राह्य धरली गेली.


याप्रकरणी गोवा गुटखाचे मालक जे. एम. जोशी यांच्यासह माणिकचंद गुटखाचे मालक रसिकलाल धारिवाल हे देखील आरोपी होते. परंतु धारीवाल यांचं खटल्या दरम्यानच निधन झाल्यानं त्यांच्यावरील खटला थांबवण्यात आला होता.

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश बी.डी. शेळके यांनी जोशी यांच्यासह आरोपी जमिरुद्दीन अन्सारी आणि फारुख अन्सारी उर्फ फारुख तालका यांना दोषी ठरवून 10 वर्षांची शिक्षा आणि 5 लाखांचा दंड ठोठावला.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com   

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.