‘जग्गू आणि जुलिएट’ चा ट्रेलर पाहण्यासाठी इथे क्लिक करा à
टीझरवरून
आपल्याला कळलंच होतं की, अमेय हा कोळीवाड्यातल्या जगदीश उर्फ जग्गूच्या भूमिकेत आहे, तर वैदेही ही अमेरिकेतल्या चितळ्यांच्या जुलिएटच्या भन्नाट भूमिकेत आहे.
या दोघांची लव्हस्टोरी (marathi lovestory movie) हटके
पद्धतीने या चित्रपटात सांगण्यात आली आहे. समाजातल्या दोन वेगवेगळ्या घटकांतून
आलेल्या या जग्गू आणि जुलिएटची प्रेमकथा कशी असेल, त्यांच्या
या प्रेमकथेत इतर पात्रांचा काय ‘रोल’ असेल
आणि ही लव्हस्टोरी शेवटी कुठे येऊन पोहोचेल हे जाणून घेण्यासाठी 10 फेब्रुवारी 2023 ला थेट चित्रपटगृहात जाऊन ‘जग्गू आणि जुलिएट’ चा आस्वाद घ्यावा लागेल.
चित्रपटाच्या
ट्रेलरवरून याचा अजून एक ‘प्लस पॉईंट’ असा दिसून येतोय की, या चित्रपटात रसिकांना नयनरम्य देवभूमी उत्तराखंडची (uttarakhand) सफर घडणार आहे. एखाद्या ट्रॅव्हल (travel) सिनेमाचा
अनुभव देणारा हा चित्रपट नक्कीच लक्षवेधी ठरेल. गंगा नदीचं मनोहारी दृश्य आणि तिचा
खळाळता प्रवाह यामुळे चित्रपटाला वेगळी उंची प्राप्त झाली आहे. महेश लिमये (Mahesh
limaye pune) यांच्या नजरेतून दिसलेली दृश्य, त्यांचे
दिग्दर्शन आणि अजय-अतुल (ajay-atul) यांची म्युझिकल ट्रिट
असं सगळं जमून आलेला हा चित्रपट आपल्याला अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल.
अमेय-वैदेही
या हटके जोडीसोबतच हृषिकेश जोशी, उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, मनोज
जोशी, समीर धर्माधिकारी, समीर चौघुले,
अविनाश नारकर, सुनिल अभ्यंकर, सविता मालपेकर, रेणूका दफ्तरदार, अभिज्ञा भावे, अंगद म्हसकर, जयवंत
वाडकर, केयुरी शाह अशा जबरदस्त कलाकारांची (artists) फौज चित्रपटात दिसत आहे, त्यामुळे मल्टिस्टार
चित्रपटाचा आनंद प्रेक्षकांना पुन्हा एकदा मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च
नुकताच पार पडला.
यावेळी
चित्रपटाचे निर्माते पुनीत बालन, दिगदर्शक महेश लिमये, संगीतकार अजय-अतुल, अभिनेता अमेय वाघ, वैदेही परशुरामी, एव्हरेस्ट म्युझिकचे संजय छाब्रिया, एए फिल्म्सचे
अनिल थडाणी, गीतकार गुरू ठाकूर, हास्यसम्राट
समीर चौघुले, लेखक गणेश पंडित, अंबर
हडप, पार्श्वसंगीतकार विजय गवंडे, अभिनेते
हृषिकेश जोशी, उपेंद्र लिमये, सुनील
उर्फ राया अभ्यंकर आदी दिग्गज उपस्थित होते.
या
सोहळ्यात अभिनेता अमेय वाघ आणि वैदेही परशुरामीने धडाक्यात एन्ट्री (entry) घेतली. अमेय वाघने खास 'जग्गू'
शैलीत सगळ्यांशी वार्तालाप करून हशा पिकवला.
‘पुनीत बालन स्टुडिओज्’ ने यापूर्वी निर्मिती केलेला
सामाजिक विषयावरील ‘मुळशी पॅटर्न’ (mulshi pattern) च्या सुपरहिट यशानंतर आता ‘जग्गू आणि जुलिएट’
च्या रूपात नवीकोरी रोमँटिक लव्हस्टोरी (romantic lovestory) प्रदर्शित होत आहे. पुनीत बालन स्टुडिओज् निर्मित, अजय-अतुल
म्युझिकल आणि महेश लिमये यांच्या दिग्दर्शनाची आणि कॅमेऱ्याची जादू दाखवणारा ‘जग्गू आणि जुलिएट’ 10 फेब्रुवारी 2023 रोजी आपल्या भेटीस येत आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84