पुणे, दि. 19 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): नवोदितांना हक्काचे व्यासपीठ
मिळवून देण्यासाठी सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या जाई फाउंडेशन द्वारा
संचालित शब्दवेल साहित्य मंच, मुंबई यांचे तिसरे शब्दवेल साहित्य संमेलन विद्येचे
माहेरघर पुणे येथे कॉस्मोपॉलिटीन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने
दिनांक 21 जानेवारी व 22
जानेवारी 2023 रोजी आझम कॅम्पस, असेंब्ली
हॉल, छावणी परिसर, पुणे येथे आयोजित
करण्यात आल्याची माहिती शब्दवेल साहित्य मंचचे अध्यक्ष प्रविण बोपुलकर यांनी दिली. (3rd Shabdvel Sahitya Sammelan Organized by Jai Foundation will be held on 21st and 22nd Jan 2023 in association with Cosmopolitan Education Society at Maherghar University Held at Azad Campus, Assembly Hall, Cantonment Campus)
विद्येच्या माहेरघरात होत असलेल्या या संमेलनाला ज्येष्ठ साहित्यिका
साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका कवयित्री आसावरी काकडे या अध्यक्षा तर 95
व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे सर उदघाटक म्हणून
लाभलेले आहेत.
या संमेलनाचे स्वागताध्यक्षपदी कॉस्मोपॉलिटीन एज्युकेशन
सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार सर तर कार्याध्यक्ष म्हणून मेहबूब कासार
(राज्यकर उपआयुक्त वस्तू व सेवा कर विभाग,मुंबई), प्रमुख अतिथी म्हणून रेश्मा घाणेकर मॅडम, (राज्यकर
सहआयुक्त वस्तू व सेवा कर विभाग, पुणे) तर समारोपीय
सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून पुष्पराज गावंडे (सदस्य, महाराष्ट्र
राज्य साहित्य व संस्कृती मंडळ) यांची उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी केंद्रिय
कार्यकारिणी सहसचिव रामदास गायधने, संघटनप्रमुख देवेंद्र
इंगळकर, शब्दवेल युथ विंगचे अध्यक्ष अमोल चरडे, पुणे जिल्हाध्यक्षा विद्या अटक, उपाध्यक्षा नलिनी
पवार, तांत्रिक विभाग प्रमुख वैभव वऱ्हाडी हेही उपस्थित राहतील.
या दोन दिवसीय साहित्य संमेलनात उद्घाटन सोहळा, निमंत्रितांचे कविसंमेलन, परिसंवाद, प्रकट
मुलाखत, गझल मुशायरा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा असे
दर्जेदार सत्रनिहाय आयोजन करण्यात आले. साहित्यिकांनी आणि रसिकांनी जास्तीतजास्त
संख्येने संमेलनास उपस्थित राहून दर्जेदार साहित्य मेजवानीचा आस्वाद घेण्याचे
आवाहन शब्दवेल साहित्य मंचमार्फत करण्यात आलेले आहे. अधिक माहितीसाठी प्रविण
बोपुलकर मो. 7720945002 या क्रमांकावर संपर्क करावा.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84