Type Here to Get Search Results !

अखेर वडिलांचा निश्चय फळाला आला; १०० दिवसांनी मुलाच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला

 


पुणे, दि. 21 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): आंबेगाव खुर्द परिसरातील जांभूळवाडी दरीपुलाखाली मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तीन महिन्यांनंतर खुनाचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना अटक केली. ही घटना 10 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी घडली होती. (After three months, the police registered a case of murder in connection with the murder of a young man who was found dead under the Jambhulwadi bridge in Ambegaon Khurd area.)

 

किरण रोहिदास शेंडकर (वय 24, रा. दत्तनगर, गुजरवाडी, कात्रज) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणाबाबत मृत तरुणाचे वडील रोहिदास चंद्रकांत शेंडकर यांनी फिर्याद दिली होती.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचा मुलगा किरण याचा मृतदेह जांभूळवाडी दरी पुलाखाली आढळला होता. पोलिसांना प्रथमदर्शनी मारहाणीच्या खुणा अंगावर दिसल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. परंतु किरण हा तिघांसोबत पार्टी करण्यास गेला होता. त्यांनीच किरणचा खून केल्याचा संशय फिर्यादींनी व्यक्त केला होता.

 

पोलिसांनी चौकशीस टाळाटाळ केल्यामुळे मृत तरुणाच्या वडिलांनी पोलिस आयुक्त आणि पालकमंत्र्यांकडे तक्रार केली. ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला होता. तरुणाचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याची शक्यता असावी, असा अभिप्राय डॉक्टरांनी दिला.

 

त्यावर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी आदेश सुभाष मगरे (वय 23), योगेश गोकूळ सपकाळे (वय 28) आणि विशाल विष्णू कांबळे (वय 25, सर्व रा. आंबेगाव पठार) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.