Type Here to Get Search Results !

कारागृहातील कैद्यांना आता अंघोळीसाठी मिळणार गरम पाणी; टेलिफोन कॉइन बॉक्सची संख्या वाढविण्याचाही निर्णय

 


पुणे, दि. 21 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स):राज्यातील कारागृहातील कैद्यांना आता अंघोळीसाठी गरम पाणी मिळणार आहे. तसेच, कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांसोबत संवाद साधण्यासाठी टेलिफोन कॉइन बॉक्सची संख्या वाढविण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

 

महाराष्ट्रातील कारागृहे ही सुधारगृहे व्हावीत, यासाठी अतिरिक्त महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी सर्व कारागृहांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये कैद्यांना त्यांच्या अडचणी जाणून नियमानुसार आवश्यक सोयीसुविधा पुरविण्याच्या सूचना कारागृह अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या आहेत. त्यानुसार कारागृह प्रशासनाकडून आता कैद्यांना सुविधा उपलब्ध होणार आहे. (Additional Director General of Police Amitabh Gupta has ordered that prisoners in the state will now get hot water for bathing and more phones to talk to relatives.)

 

कारागृहातील कैद्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांची गर्दी होत असते. त्यासाठी कैद्यांना भेटण्यासाठी असलेल्या मुलाखतीच्या खिडक्या वाढविण्यात याव्यात. तसेच, नातेवाइकांसोबत संवाद साधण्यासाठी टेलिफोन कॉइन बॉक्सचीही संख्या वाढवावी, अशा सूचना अतिरिक्त महासंचालक गुप्ता यांनी दिल्या आहेत.

 

राज्यात सध्या कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे कैद्यांनी त्यांना अंघोळीसाठी गरम पाणी तसेच, झोपण्यासाठी चादर, उशी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार कारागृहात तयार होणाऱ्या या वस्तू आवश्यकतेनुसार द्याव्यात. याबाबत अतिरिक्त पोलीस महासंचालक गुप्ता यांनी आदेश दिले आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.