(A young pharmacist tried to steal a gold earring from a pedestrian woman at santoshnagar in katraj to pay off a debt.)
पुणे, दि. 19 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पादचारी महिलेच्या कानातील सोन्याची वेल ओढून
चोरण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कात्रजमधील संतोषनगर येथे सोमवारी
(दि. 16 जानेवारी 2023) सायंकाळी 5:15 वाजता घडली.
याबाबत
जाधवनगर मधील एका 38 वर्षाच्या महिलेने
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश हनुमंत कदम (वय 23 वर्षे, राहणार हरपळे वस्ती, फुरसुंगी,
हडपसर) असे या चोरट्याचे नाव आहे.
याबाबत
भारती विद्यापीठ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या सासूसोबत संतोषनगर मधील गल्ली
क्रमांक 7 मधून पायी जात होत्या. त्याच वेळी त्यांच्या पाठी
मागून एक जण आला व त्याने अचानक त्यांच्या कानातील सोन्याचे वेल जबरदस्तीने ओढून
चोरण्याचा प्रयत्न केला. वेल निघत नाही म्हटल्यावर त्याने तो कापण्याचा प्रयत्न
केला. दरम्यान फिर्यादी यांनी त्याला विरोध करीत आरडाओरडा केल्यामुळे आजू बाजूच्या
लोकांचे लक्ष काय गोंधळ उडाला आहे म्हणून त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी लगेच या
चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी
चोरट्याला अटक केली असून तो फार्मसीस्ट आहे. तो कर्जबाजारी झाल्याने त्याने चोरीचा
प्रयत्न केल्याचे चौकशीत उघड झाले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धिरज
गुप्ता करीत आहेत.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84