Type Here to Get Search Results !

कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी संबंधीत संस्थांची बैठक घेऊन तोडगा काढा: सुप्रिया सुळे

 


पुणे, दि. 23 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): कात्रज चौकात सुरू असलेल्या उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकारणाच्या कामामुळे वाहतुकीच्या वेळी प्रचंड कोंडी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाची तातडीने बैठक लावून समन्वय साधावा, अशा सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिल्या. (MP Supriya Sule today instructed Municipal Commissioner Vikram Kumar that National Highway Authority, Public Distribution and Water Supply Department should hold an urgent meeting to address issue of huge traffic jams as a result of ongoing flyover and road widening work at Katraj Chowk.)

 

खासदार सुळे यांनी आज ऐन गर्दीच्या वेळीच सकाळी 9 वाजता कात्रज चौकाला भेट देऊन येथील वाहतूक कोंडी आणि चालू कामांचा आढावा घेतला. कामांची पाहणी करत त्यांनी अधिकाऱ्यांना कामे त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश दिले. तसेच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन काम करणाऱ्या सर्व संबंधित संस्थांची संयुक्त बैठक बोलावून वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था काय करता येईल यावर चर्चा करावी, अशा सूचना दिल्या.

 

उड्डाणपूल व रस्त्याच्या कामांसह महावितरण, सर्व्हिस रोड, पाण्याची पाईपलाईन अशी सर्वच कामे एकत्रितपणे सुरु आहेत. परिणामी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. सर्वच प्रकारच्या वाहनधारक, पादचारी, रस्त्यालगतचे व्यावसायिक, दुकानदार तसेच स्थानिक नागरिकांनाही या कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या मध्येच उड्डाणपुलासाठीचे खांब उभे करण्याचे काम सुरू आहे. त्याचवेळी दोन्ही बाजूला सर्व्हिस रस्ता आणि रुंदीकरणही चालू आहे. परिणामी वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला रस्ता अत्यंत अपुरा झाला आहे, इतकेच नाही, तर त्याची दशाही अत्यंत वाईट झाली आहे. परिणामी लहान मोठे अपघात देखील होत आहेत. ही गंभीर बाब आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे.

 

या कामांबाबत शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय आणि पर्यायी उपाययोजनेचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कात्रज चाैकातील वीज, पाणी पाईप लाईन, पुलाचे काम आणि सेवा रस्ते या चार विषयांवर सविस्तर चर्चा झाली होती. त्यावेळी महापालिकेने ही कामे पूर्ण करण्यासाठी 1 मे 2023 ची डेडलाईन दिली होती. तथापि कामाची गती, आवाका आणि पद्धत पाहता ही तारीख गाठणे शक्य होईल अशी परिस्थिती परिस्थिती सध्या तरी दिसत नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

आम्ही या कामाचा सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. परंतु महापालिका प्रशासनाचे अपेक्षित सहकार्य अद्यापही मिळत नसल्याने ही कामे संथगतीने सुरु आहे, असे त्या म्हणाल्या. माजी सनदी अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर-हवेलीचे नेते संभाजीराव झेंडे, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, संतोष फरांदे यांच्यासह स्थानिक नागरीक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.