Type Here to Get Search Results !

खडकवासल्यात गाड्यांची तोडफोड करणारे ताब्यात; दारू पिऊन घातला होता राडा

 

पुणे, दि. 5 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): खडकवासला येथे कोयते, लोखंडी सळई व दगडगोट्यांनी वाहनांची तोडफोड करून दहशत माजविणार्‍या दोन सराईत गुन्हेगारांना हवेली पोलिसांनी आठ तासांत जेरबंद करून गजाआड केले.

दारूच्या नशेत कोयता, लोखंडी रॉड व दगडांनी वाहनांची तोडफोड करत मरगळे व कांबळे यांनी खडकवासला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात पहाटे चारच्या सुमारास दहशत निर्माण केली. रस्त्याच्या कडेने उभ्या असलेल्या पाच कार व एका टेम्पोची तोडफोड केली आहे.

विलास मरगळे (वय 23, रा. दासवे, ता. मुळशी) व सौरभ कांबळे (वय 24, रा. खडकवासला) अशी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात हवेली पोलीस ठाण्यात 307 कलमाखाली गुन्हे दाखल आहेत.

वाहनांच्या तोडफोडीची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्यासह पथकाने तातडीने फरार मरगळे व कांबळे याचा शोध सुरू केला. पोलीस हवालदार विजयकुमार कांबळे यांनी पाठलाग करत अवघ्या आठ तासांतच दोघांना जेरबंद केले. हल्लेखोरांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वेगाने शोधमोहीम सुरू केली.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84     


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.