Type Here to Get Search Results !

खेड शिवापूर टोल नाक्यावर तब्बल ८ किलो गांजा पकडला; पाच जण गजाआड

 

पुणे, दि. 17 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): राजगड पोलिसांनी सोमवारी सकाळी खेड शिवापूर टोल नाक्यावर एका मोटारगाडीतून सुमारे 80 हजार रुपये किमतीचा सुमारे 8 किलो गांजा पकडला. आरोपींच्या ताब्यातील मोटारगाडी आणि गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच पोलिसांनी याप्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. (Rajgarh police seized about 8 kg of ganja worth around Rs 80 thousand from a car at Khed Sivapur toll booth on Monday morning.)

याबाबत राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. 16 जानेवारी 2023) सकाळी खेड-शिवापूर टोल नाक्यावर राजगड वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी वाहनांवर वाहतूक कारवाई करत होते. यावेळी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास साताऱ्याच्या दिशेने जाणारी एक मोटारगाडी वाहतूक पोलिसांना संशयास्पद वाटली. ही मोटारगाडी बाजूला घेऊन पोलिसांनी त्या मोटारगाडीची तपासणी केली. यावेळी त्या मोटारगाडीत ठेवलेल्या एका प्रवासी बॅगेत गांजा आढळून आला.

राजगडचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे, सचिन कदम, निलेश होवाळ, अमोल सूर्यवंशी, अजित माने, संतोष तोडकर, वाहतूक वार्डन पंकज शिंदे यांनी ही कारवाई केली.

ईस्माईल बाबु सय्यद ( वय 30, रा. कनगल्ला, ता. हुकेरी, जि. बेळगांव, सैफाली शब्बीर सुतार (वय 23, रा. निपानी, ता. हुकेरी, जि. बेळगांव, कर्नाटक) जैनुल गजबार मुल्ला (वय 35, रा. सोलापूर दर्गा गल्ली, ता.हुकेरी, जि. बेळगांव, कर्नाटक) जिआउल रेहमान रियाज मुजावर (वय 20, रा. हरणापूरगड, ता.हुकेरी, जि. बेळगांव, कर्नाटक) आजु अजगर अल्ली खान (वय 21, रा. माणखुर्द, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील मोटारगाडी आणि सुमारे 80 हजार रुपये किमतीचा 8 किलो गांजा जप्त केला असून 5 जणांवर गुन्हाही दाखल केला आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com     

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.