Type Here to Get Search Results !

कोकण भुमिपुत्र/कन्या युवा सामजिक प्रतिष्ठान आयोजित दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यासोबातच तिळगुळ समारंभही साजरा

 

पुणे, दि. 18 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): कोकण भुमिपुत्र/कन्या युवा सामजिक प्रतिष्ठान आयोजित दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व मकर संक्राती निमित्ताने तिळगुळ वाटप, हळदी-कुंकु समारंभ रविवार दि.15 जानेवारी 2023 रोजी जनता सांस्कृतिक हॉल, पर्वती पुणे येथे मोठ्या दिमाखात पार पडला. (On the occasion of calendar release ceremony and Makar Sankranti organized by Konkan Bhumiputra/Kanya Yuva Samaj Pratishthan, Tilagul distribution, Haldi-Kunku ceremony was held on Sunday 15th January 2023 at Janata Cultural Hall, Parvati Pune.)

उपरोक्त संस्थेच्या वतीने 2018 पासुन कला, क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रात  विविध उपक्रम राबविन्यात आले व यशस्वी झाले.

 

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली पुढे मान्यवरांचे सत्कार समारंभ,दिनदर्शिका प्रकाशन सोहळा,मान्यवरांचे मनोगत व हळदी कुंकू समारंभ असा कार्यक्रम पार पडला.

 

कार्यक्रमा प्रसंगी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या उपक्रमांचे व युवकांच्या एकजुटीचे कौतुक करण्यात आले. ह्या वर्षी वर्ष्याच्या सुरुवातीला दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व हळदी-कुंकु समारंभ ह्या कार्यक्रमासाठी उपरोक्त संस्थेचे मार्गदर्शक श्री.विजयजी शिंदे साहेब यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली.

 

कार्यक्रमासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पर्वती विभाग उपविभाग अध्यक्ष श्री.योगेशदादा आढाव व सौ.नलिनीताई आढाव तसेच संस्थेचे मार्गदर्शक-सल्लागार श्री सचिनजी रेमजे साहेब,श्री.नारायणजी रेवाले साहेब,श्री. मनोहरजी नाचरे साहेब यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच महाड तालुका रहिवासी संघाचे-मा.श्री.सुनिलजी पवार साहेब,रूपेशजी पार्टे साहेब, संजयजी मोरे साहेब,महाड प्राण प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष श्री. मुकेशभाई पोटे,भाजपा पर्वती सरचिटणीस श्री.राजाभाऊ कदम,शिवसेना पर्वती विभागप्रमुख श्री.सुरजदादा लोखंडे,सौ.मानसीताई देवाळे व सौ.नलिनीताई आढाव,मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे श्री. सतिशजी मोरे साहेब,जनकल्याण फाउंडेशनचे श्री. संतोषजी जाधव साहेब, सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेशजी सपकाळ साहेब, श्री. कैलासजी सावंत साहेब, श्री प्रविणजी भोज साहेब, श्री.विनायकजी जोशी साहेब, श्री.संजयजी गावडे साहेब, श्री.ज्ञानेश्वरजी भागणे साहेब, श्री. दिनेशजी गिजे साहेब, साहिल केम्युनिकेशनचे श्री.हेमंतजी मोरे साहेब, पै.श्री.भरतजी चौधरी साहेब, शाहीर श्री.दगडू हुंबरे व विविध सामजिक संस्थांचे व राजकीय मान्यवर मंडळी तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी विजय शिंदे, ऋषिकेश कवडे, ऋषिकेश लाड, प्रसाद बोले, प्रथम हुंबरे यांनी प्रचंड मेहनत घेतली व संस्थेचे पदाधिकारी पूर्वेश मलेकर, रोशन गोमले, सुदेश भागणे, अक्षय निकम, पूजा गावडे, सौ.तनया खांबे, सौ.विधीशा शिंदे, दर्शना निकम, विनायक जाडे, जय जाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते व सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. तुषार खांबे व आभार प्रदर्शन कु.वृषाली गोरीवले यांनी केले,तसेच नववर्षाची दिनदर्शिका रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड, मंडणगड, चिपळूण व कोकणातील गावांत विनामूल्य वितरण करण्यात येणार आहेत व ज्यांची जाहीरातरुपी मदत करू उपक्रमास सहकार्य केले त्यांचे आभार व्यक्त करत आहोत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.