पुणे, दि. 28 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): कोथरूड, वेदभवनकडून महामार्गाला जोडणाऱ्या सर्व्हिस रस्त्याचे (kothrud vedbhawan service road) काम प्रगतीपथावर आहे. हा रस्ता खुला झाल्यावर कोथरूडकडून मुंबई, मुळशी आणि बावधनला जाणाऱ्या वाहनचालकांचा वळसा कमी होणार आहे. येत्या दिड महिन्यांत हे काम पूर्ण होईल, असे एनएचएआयच्या (NHI) अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. एनडीए चौकातील (चांदणी चौक) (chandani chowk) रस्तारूंदीकरण आणि उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडून महिन्याभरात लेनची संख्या वाढविण्यात आली आणि महामार्ग (highway) मोठा झाला. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न 80 टक्के सुटला. चौकातील काम पूर्ण झाल्यावर नक्कीच पर्यायी मार्ग उपलब्ध होतील, मात्र सध्या तरी बावधन, मुळशी, कोथरूड, वारजेकडून इच्छितस्थळी जाण्यासाठी वाहनचालकांना एकच मार्ग असून, पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने सकाळ आणि संध्याकळी वाहनांची कोंडी होत आहे, त्यामुळे हे मार्ग सुरू झाल्यावर वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळू शकेल.
महामार्गावरील लेन (highway lane) वाढविल्यामुळे चौकातील वाहतूक कोंडीने काहीसा मोकळा श्वास घेतला. मात्र, कोथरूड, वेदभवनकडून मुंबई (Mumbai), मुळशी (mulshi) किंवा बावधनला (bavdhan) जाणाऱ्या वाहनचालकांना जवळपास एक किलोमीटरचा वळसा मारून महामार्गावर यावे लागत आहे. हा रस्ता चढउताराचा असल्यामुळे वाहनांचा वेग मंदावलेला असतो यातून कोंडीही होते, त्यामुळे पर्यायी मार्ग लवकर खुला व्हावा, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
महामार्गालगत वेदभवनकडून येणाऱ्या सर्व्हिस रस्त्याचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. केवळ चौकातील अपूर्ण कामामुळे पुढील कामाला वेळ लागत असून, पुढील एक ते दीड महिन्यांत हे काम पूर्ण झाल्यावर सर्व्हिस रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल. त्यामुळे नागरिकांचा एक किलोमीटरचा वळसा टळणार आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84