Type Here to Get Search Results !

वकील साहेब तुम्ही सुद्धा! ; कुटुंबाला जेलमध्ये टाकण्याची धमकी देवून सव्वा कोटी उकळले?

 

पुणे, दि. 17 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): कुटुंबाला जेलमध्ये टाकण्याची धमकी देवून एक कोटी 22 लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासह तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा डेक्कन पोलिसांकडून करण्यात आला आहे. (In case of extorting for rupees 1.22 cr by threatening to throw family in jail  deccan police registered case against Adv. Praveen Chavan and three others)

 

याप्रकरणी सूरज सुनील झंवर (रा. सुहास कॉलनी, जळगाव) यांनी सोमवारी (ता. 16 जानेवारी 2023) फिर्याद दिली आहे. ॲड. प्रवीण पंडित चव्हाण (रा. मोदीबाग, शिवाजीनगर), शेखर मधुकर सोनाळकर (रा. जळगाव) आणि उदय नानाभाऊ पवार (रा. चाळीसगाव, जि. जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात या कथित भ्रष्टाचाराची संभाषण असलेली पेनड्राइव्ह सादर करून खळबळ उडवून दिली होती.

 

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी झंवर यांचा जळगाव येथे वेअर हाउसिंगचा व्यवसाय आहे. भाईचंद हिराचंद सोनी मल्टिस्टेट पतसंस्था दिवाळखोरीत निघाल्यानंतर अवसायकामार्फत पतसंस्थेच्या जप्त मालमत्तेचा लिलाव करण्यात आला. त्यात फिर्यादीचे वडील सुनील झंवर यांनी घोल रोड, निगडी आणि नसिराबाद येथील मिळकती इ-लिलावात खरेदी केल्या. या प्रकरणात सुनील झंवर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून डेक्कन पोलिसांनी त्यांना अटक केली. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता.

 

या प्रकरणी ॲड. प्रवीण चव्हाण यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली होती. चव्हाण यांनी उदय पवार यांच्यामार्फत सूरज झंवर यांना तुझ्या वडिलांची चार-पाच वर्षे जेलमध्ये वाट लावून टाकतो. वडिलांना जामीनावर सोडायचे असल्यास दोन कोटी रुपयांची व्यवस्था कर, अशी धमकी दिली.

त्यामुळे भीतीपोटी ॲड. चव्हाण याच्या सांगण्यावरून उदय पवार याला रोख एक कोटी 22 लाख रुपये दिले. त्यानंतर चव्हाण याने मी आणि शेखर सोनाळकर तुझे सर्व कामे करून देतो’, असे सांगितले. परंतु चव्हाण याने कोणतीच मदत केली नाही. याउलट वडील सुनील झंवर यांनी मिळकती विकत घेताना 61 कोटींची अफरातफर केल्याचा अहवाल उच्च न्यायालयात सादर केला.

येरवडा कारागृहातून बाहेर आल्यानंतर वडिलांनी चव्हाण आणि पवार यांना पैसे परत करण्याची मागणी केली. परंतु चव्हाण याने फोनवर धमकी दिली, असे झंवर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

याविषयी ॲड. प्रविण चव्हाण म्हणाले,”माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घटल्यानंतर दीड वर्षांनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यामागील उद्देश यातून स्पष्ट होतो.”

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com     

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.