Type Here to Get Search Results !

लेकटाउन सोसायटीच्या अकराव्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू; घरमालक आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल

 

पुणे, दि. 21 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): मजुरांच्या सुरक्षेसाठी अनेक नियम बनवले जात असताना, अनेक मजुरांचा नाहक बळी जाताना दिसतो आहे. अशाच प्रकारे पुन्हा एका मजुराचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज मधील लेकटाउन सोसायटी मधून समोर आली असून, घरमालक आणि ठेकेदाराविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Laborer dies after falling from eleventh floor of Laketown Society.)

 

सुनील भीमराव शिंगाडे (वय 27 वर्षे, रा. लक्ष्मी नगर, डहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. तर ठेकेदार सुधाकर शंकर पवार (वय 36 वर्षे, रा. डहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे) आणि घरमालक हेमंत भोंगळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे अंमलदार नंदलाल भादले यांनी फिर्याद दिली आहे.

 

सदरील घटना लेकटाउन सोसायटी मध्ये बुधवार दि. 18 जानेवारी 2023 ला दुपारी साडेबारा वाजता घडली. यावेळी सुनील शिंगाडे हा झुल्यावरून अकराव्या मजल्यावर जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करत होता. यावेळी शिंगाडे याला सुरक्षिततेच्या दृष्टीने साहित्य पुरवणे आवश्यक असताना, ते पुरवले गेले नव्हते. दरम्यान तोल गेल्याने शिंगाडे अकराव्या मजल्यावरील झुल्यावरून खाली पडला. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्य झाला होता.

 

एकूणच ठेकेदाराने शिंगाडे याला सुरक्षा पट्टा पुरवला असता, तर शिंगाडे याचे प्राण वाचले असते. याबाबत ठेकेदाराने निष्काळजीपणा केला असल्याचे समोर आल्याने ठेकेदार आणि घरमालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढमे तपास करीत आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.