Type Here to Get Search Results !

लष्करात १७ वर्षे काम करून आता वयाच्या ४०व्या वर्षी केली MPSC पास

 

पुणे, दि. 18 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): भारतीय लष्करात 17 वर्षे देशाची सेवा करून वयाच्या चाळीशीत निवृत्तीनंतर शेती करता करता स्पर्धा परीक्षेत यश मिळणाऱ्या अश्रय झुरुंगे यांची दौंडमध्ये सध्या चर्चा होत आहे. दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेल अध्यक्ष ज्योती झुरुंगे यांचे ते दीर आहेत.(After serving the country for 17 years in the Indian Army, akshay zurunge in daund retired at the age of 40 and cleared the competitive examination.)

त्यांनी 40 व्या वर्षी एमपीएससी परीक्षेत यश मिळवलं. सध्या ते परिवहन खात्यात अधिकारी झाले आहेत. दौंड तालुक्यातील पाटेठाण गावच्या उत्साही आणि उर्जावान माजी सैनिक अश्रय झुरुंगे यांना भेटून खासदार सुप्रिया सुळे यांनी खास सत्कार केला.

 

दौंड (daund) तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे या पाटेठाण येथे गेल्या असता त्यांनी आवर्जून झुरुंगे यांची भेट घेत त्यांचा खास सत्कार केला. लष्करी सेवेनंतर पुन्हा जनतेच्या सेवेसाठी वयाच्या चाळिसाव्या वर्षी अभ्यास सुरू करून परीक्षा देणे आणि त्यात उत्तम गुणांनी पास होऊन शासकीय सेवा बजावताना जनसेवा करणे या झुरुंगे यांच्या आंतरिक उर्मीचे खासदार सुळे यांनी भरभरून कौतुक केले. त्याशिवाय पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यासोबतच नव्या पिढीने झुरुंगे यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी, असेही त्या म्हणाल्या.

 

याप्रसंगी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे विभाग अध्यक्ष वैशाली नागवडे, राष्ट्रवादीचे दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, दौंड शहराध्यक्ष गुरमुख नारंग, ज्योती झुरंगे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

सध्या अक्षय झुरुंगे परिवहन खात्यात सहायक मोटार वाहन निरीक्षक पदी कार्यरत आहेत. वयाच्या चाळीसाव्या वर्षी अभ्यास सुरू करणाऱ्या अक्षय झुरुंगे यांनी 17 वर्षे भारतीय लष्करात असतांना त्यांनी बर्फाने वेढलेल्या लेह, सियाचीन, सिलिगुडी आदी गोठवून टाकणाऱ्या थंडीच्या प्रदेशात देशाची सेवा केली आहे. तेथून निवृत्त होताना ते सुभेदार पदावर होते. त्यानंतर त्यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवल्याची चर्चा आहे.

 

निवृत्तीनंतर गावी आल्यावर अक्षय झुरुंगे यांनी शेती करण्यास प्रारंभ केला; मात्र त्यांच्यातील अभ्यासू विद्यार्थी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. अखेर वयाच्या चाळिसाव्या वर्षी त्यांनी अभ्यास करायला सुरूवात केली. याशिवाय त्यांना शेतीही करायची होतीच. ती सुद्धा प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन करायची होती. त्यामुळेच त्यांनी पारंपरिक शेतीला छेद देत शेवग्याची शेती केली; आणि त्याचवेळी एकीकडे शेती करता करता ते जोमाने अभ्यास करत एमपीएससी परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण झाले. सध्या ते राज्याच्या परिवहन खात्यात अधिकारी असून सहायक मोटार वाहन निरीक्षक पदी कार्यरत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.