Type Here to Get Search Results !

महापालिकेत खोटी कागत्रपत्र देऊन वकिलाची फसवणूक, सख्ख्या भावावर गुन्हा दाखल

 

पुणे, दि. 24 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): लहान भावाने चालवण्यासाठी घेतलेल्या दुकानाची खोटी कागदपत्रे (Fake Document) व प्रतिज्ञापत्र (Affidavits) सादर करुन दुकान नावावर करुन घेत वकील (Lawyer) असलेल्या मोठ्या भावाची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार (Pune Pimpri Crime) समोर आला आहे. (Younger brother defrauded elder brother who is lawyer by submitting fake documents and affidavits of the shop taken to run the shop in his name.)

याप्रकरणी मारुती आबा सुपेकर (Maruti Aba Supekar) (वय-70 रा. काशी विश्वेश्वर सोसायटी, केशवनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) रविवारी (दि. 22 जानेवारी 2023) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी लहान भावावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल आबा सुपेकर (Anil Aba Supekar) (वय-65 रा. गावडे कॉलनी, चिंचवड) यांच्यावर आयपीसी 420, 467, 468, 471 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मारुती सुपेकर चिंचवड येथील गावडे कॉलनीत (Gawade Colony) राजुफिश मर्चंट नावाचे दुकान आहे. हे दुकान त्यांनी लहान भाऊ अनिल सुपेकर याला चालवण्यास दिले आहे.

फिर्यादी यांच्या भावाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) करसंकलन विभागात खोटे कागदपत्र व खोटे प्रतिज्ञापत्र तयार करुन दुकान आपल्या नावावर करुन घेतले. याशिवाय अनिल सुपेकर यांनी बेकायदेशीरपणे स्वत:च्या नावावर पाण्याचे कनेक्शन घेतले. तसेच खोटी कागदपत्र महावितरण विभागाला (MSEDCL) सादर करुन आपण जागेचे मालक असल्याचे भासवून विजेचे कनेक्शन घेऊन फिर्यादी, महापालिका आणि महावितरण कंपनीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

हा प्रकार 2018 ते 2019 या कालावधीत चिंचवड येथे घडला आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.