Type Here to Get Search Results !

गवा गेला आता पुन्हा शिकारीला बिबट्या आला; सिंहगड खोऱ्यात वन्यजीवांचा मुक्त संचार

 

पुणे, दि. 7 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सिंहगड किल्ल्याच्या परिसरात पुन्हा बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. गडाच्या पायथ्याला डोणजे येथील चव्हाणवाडी (ता. हवेली) येथे शेतकर्‍यांसमोरच एका धष्टपुष्ट बिबट्याने वासराचा फडशा पाडला.

ही घटना गुरुवारी (दि. 5 जानेवारी 2023) भरदुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. सोमनाथ चव्हाण यांनी शेतात चरण्यासाठी गाय बांधली होती. तिचे वासरू शेजारी चरत होते. त्या वेळी जंगलातून आलेल्या बिबट्याने वासरावर हल्ला केला. त्यामुळे गायीने जोरदार हंबर्डा फोडला. तेथे असलेल्या स्वप्निल चव्हाण, वसंत चव्हाण, सोमनाथ चव्हाण यांनी तेथे धाव घेतली असता बिबट्या वासराचा फडशा पाडत होता. बिबट्या शेतकर्‍यांकडे पाहत गुरगुरत होता.

बिबट्याच्या तावडीतून वासराची सुटका करण्यासाठी शेतकर्‍यांनी जोरदार आरडाओरडा करूनही बिबट्याने वासराला सोडले नाही. बिबट्याचा उग्र अवतार पाहून शेतकर्‍यांनी प्रसंगावधानता दाखवत बाजूला धाव घेतली. त्यामुळे मनुष्यहानी टळली. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वासराने काही क्षणातच तडफडून प्राण सोडला. त्यावेळी शेजारील शेतात नंदा कुंडलिक चव्हाण गहू मशागत करीत होत्या. शेतकर्‍यांनी आरडाओरडा करूनही बिबट्या जागचा हलला नाही. वासराचे रक्त पिऊन तो गुरगुरत जंगलात पसार झाला.

डोणजे, चव्हाणवाडी, गोळेवाडी तसेच गडाच्या परिसरात नागरी वस्त्या वाढल्या आहेत. शेती, जनावरांचे गोठे आहेत. शेतकरी, गुराखी तसेच पर्यटकांचीही वर्दळ सुरू आहे. त्यामुळे परिस्थिती पाहता वन विभागाने नागरिकांसाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

वन विभागाच्या वन परिमंडलाधिकारी वैशाली हाडवळे, सिंहगड वन विभागाचे अधिकारी बाबासाहेब लटके, बाळासाहेब जिवडे, कल्पना सकपाळ यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. वनपरिमंडलाधिकारी हाडवळे म्हणाल्या की,”बिबट्याचा शोध घेण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविले आहेत. रेस्क्यू टीमचे नचिकेत उत्पात, एजाज शेख, नरेश चांडक यांच्यासह वन कर्मचारी परिसरात बिबट्याचा शोध घेत आहेत. नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.”

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com 

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.