पुणे, दि. 12 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यात एमबीएचे (MBA) शिक्षण घेऊन युनायटेड किंगडम (युके) मध्ये राहत असलेल्या पत्नीचा खून करणाऱ्या पतीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सतप्रीत सिंग गांधी (वय 37) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. युकेमधील लीड्स क्राऊन न्यायालयाने हा निकाल दिला.
गांधी याने 32 वर्षीय पत्नी हरलीन कौर सतप्रीत गांधी यांचा चाकूने वार करून खून केला होता. हेडिंग्ले येथील व्हिक्टोरिया रोडवरील फ्लॅटमध्ये 5 सप्टेंबर 2022 रोजी हा प्रकार घडला होता. सतप्रीतला न्यायालयाने किमान 23 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत सीपीएसच्या वरिष्ठ सरकारी वकील एम्मा कोव्हिंग्टन म्हणाल्या,”हरलीन यांची हत्या पूर्वनियोजित आणि भयानक होती. गांधी याने आपल्या पत्नीची हत्या केली कारण, तो तिच्यावर मनमर्जी नियंत्रण ठेवू शकला नाही. यूकेला गेल्यानंतर तिने स्वतःसाठी निर्माण केलेले विश्व गांधीला पाहवले नाही. त्यांच्या दोन लहान मुलांना त्यांच्या पालकांपासून वंचित ठेवलेले आहे. फिर्यादींनी गांधीविरुद्ध चांगला खटला निर्माण केला. पुराव्याचा सामना करावा लागला तेव्हा गांधीने आपल्या पत्नीच्या हत्येचा गुन्हा कबूल केला,”
याबाबत सर्व क्राऊन प्रॉसिक्युशन सेवा (सीपीएस) या ब्रिटनमधील सरकारी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तातही नमूद आहे.
सतप्रीत यांचे वडील पुण्यातील दापोडी भागातील रहिवासी आहेत. या न्यायनिवाड्याबद्दल सतप्रीतच्या पालकांनी ब्रिटनमधील न्यायालयाचे आभार मानले. ते म्हणाले,”वेस्ट यॉर्कशायर पोलिसांनी सतप्रीतला दोषी ठरवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि जलद खटला मंजूर करणाऱ्या न्यायव्यवस्थेचे आम्ही आभार मानतो. आमच्या दुसऱ्या मुलीच्या मृत्यूनंतर आम्ही पूर्णपणे खचून गेलो होतो. मात्र वेस्ट यॉर्कशायर पोलिसांनी आम्हाला विश्वास दिला आणि संपूर्ण प्रकरणात आम्हाला सहकार्य केले,”
हरलीनचे जानेवारी 2015 मध्ये गांधींशी लग्न झाले होते. गांधीचे हे दुसरे लग्न होते. त्याने आधी हरलीनची मोठी बहिणी सिमरन कौरशी लग्न केले होते. मात्र तिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर हरलीन आणि गांधी यांचा विवाह झाला होता. मार्च 2021 मध्ये हरलीन तिच्या मास्टर्स प्रोग्रामचा पाठपुरावा करण्यासाठी यूकेमध्ये शिफ्ट झाली. त्यावेळी गांधी तिच्यासोबत आश्रित व्हिसावर तिथे गेला होता.
हे पाहता हरलीनच्या वडिलांनी त्यांच्या धाकट्या मुलीच्या मृत्यूबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले,“आम्हाला शंका आहे की, हरलीनप्रमाणेच गांधीने सिमरनची हत्या केली असावी. तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची बतावणी केली असावी. त्यामुळे आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी करतो.”
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84