पुणे, दि. 23 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गहुंजे येथील ‘लोढा बेलमोंडो’ या प्रकल्पातील सुमारे 2800 रहिवाशांनी फसवणूक झाल्याचा आरोप करीत संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरोधात रविवारी (दि. 22 जानेवारी 2023) मोर्चा काढला. (Around 2,800 residents of the 'Lodha Belmondo' project at Gahunje on the Pune-Mumbai Expressway staged a protest on Sunday against the concerned builder, alleging fraud.)
प्रलंबित मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या रहिवाशांनी दिला आहे. विकसक व कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या कंपनीचा हा प्रकल्प आहे. रहिवाशांनी वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित कंपनी खाली नमूद केलेल्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे संतप्त रहिवासी रविवारी रस्त्यावर आले. या वेळी सुमारे 600 रहिवाशी आंदोलनात सहभागी झाले.
करारनामा योग्य प्रक्रियेने न करणे, मेंटेनन्सच्या नावाखाली अवाजवी रक्कम वसूल करणे, बांधकामाची अपेक्षित गुणवत्ता न राखणे, सोसायटीची स्थापना न करणे, कन्व्हेअन्स डीड करून न देणे, ग्राहकांनी बनवलेली व नोंदणी केलेली सोसायटी व फेडरेशनची नोंदणी रद्द करायला लावणे, मेंटनन्सचा कोणताही हिशेब न देणे आदी सदनिकाधारकांच्या तक्रारी आहेत.
याबाबत कंपनीचे प्रवक्ते म्हणाले,”2800 रहिवाशांपैकी अधिकृत पद धारण करणाऱ्या काही व्यक्ती बिनबुडाचे आरोप करून आर्थिक लाभ प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘लोढा बेलमोंडो’ हे पुण्यातील प्रसिद्ध रहिवासी संकुल असून रहिवासी आणि विकसक यांचा सातत्यपूर्ण संवाद सुरू आहे.”
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84