Type Here to Get Search Results !

उशिरापर्यंत सुरू असलेले धंदे करतायत पोलिसांचेच वांदे; मध्यरात्री पुन्हा पोलिसांवर हल्ला

 

पुणे, दि. 17 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी (warje malwadi) मधील गणपती माथा (ganpati matha) भागात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या रॉयल पान शॉप (royal pan shop) समोर गस्तीवरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर दगडफेक झाल्याची घटना ताजी असतानाच, आता पुण्यातील लोहगाव (lohagaon) मधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये गस्तीवरील पोलिसावर चाकू हल्ला करण्यात आला असून, पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत. मध्यरात्री 2:45 च्या सुमारास लोहगाव परिसरात ही घटना घडली आहे.

पोलीस नाईक सचिन उत्तम जगदाळे (वय ३८) असे जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात महानंदेश्वर उर्फ मल्या महादेव बताले (वय २४, रा. नळदुर्ग, जि. उस्मानाबाद) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तक्रारदार सचिन जगदाळे हे रात्रगस्तीवर होते. या दरम्यान, लोहगाव येथील धानोरी जकात नाका येथील समायरा चायनिज सेंटर रात्री अडीच वाजता देखील सुरू होते. हे सेंटर पोलीस कर्मचारी सचिन जगदाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बंद केले. यावेळी महानंदेश्वर हा त्या ठिकाणी जेवणासाठी आला होता. मात्र चायनिज सेंटर बंद केल्याने त्याला जेवण मिळाले नाही. त्याचा राग येऊन महानंदेश्वर याने चायनिज सेंटर मधील चाकू घेऊन सचिन जगदाळे यांच्यावर हल्ला केला.

अचानक झालेल्या या हल्ल्यात तोंडावर मारलेला चाकू चुकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सचिन जगदाळे यांच्या गालावर चाकूचा तीक्ष्ण वार झाला असून, गाल फाटला असल्याची माहिती समोर येते आहे. याप्रकरणी महानंदेश्वर उर्फ मल्या महादेव बताले याला अटक करण्यात आली आहे.

शहरात अनेक मोठे नामांकित गुन्हेगार होते आणि आजही आहेत. मात्र ते वर्दी आणि वर्दीवरील पोलिसांचा आदर करतानाचे चित्र पाहायला मिळते. मात्र असे असले तरी, काही गुन्हेगारांची आता वर्दीवरील पोलिसांवर हात टाकण्याची हिंमत होऊ लागली असल्याचे गंभीर चित्र देखील समोर येत आहे.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com     

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.