Type Here to Get Search Results !

"लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींचे आयुष्य उध्वस्त होत आहे; कायदा व्हावा": राजा भैय्या

 

पुणे, दि. 23 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): हिंदू आक्रोश मोर्चाचा समारोप डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ झाला. ही सभा रविवारी (दि. 22 जानेवारी 2023) झाली. सभेत तेलंगणातील आमदार राजा भैय्या उर्फ राजसिंग ठाकूर, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले, शिवाजी महाराज मोरे, धनंजय देसाई आदी या वेळी उपस्थित होते. (The Hindu aakrosh Morcha concluded near statue of Chhatrapati Sambhaji Maharaj at Deccan Gymkhana and it was demanded that strict law should be made against love jihad.)

 

“लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींचे आयुष्य उध्वस्त होत आहे. हे थांबायला हवे. लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधात लढणे हे आपले कर्तव्य आहे. राज्य सरकारने लव्ह जिहादविरोधात कठोर कायदा आणला पाहिजे”, असे मत राजा भैय्या यांनी व्यक्त केले.

 

ठाकूर म्हणाले,”हा हिंदूंचा आक्रोश मोर्चा नाही, ही तर हिंदूंची गर्जना आहे. ज्या साठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हिंदू सहभागी झाले आहे. मी ज्या-ज्या भागात फिरलो, त्याभागापेक्षा महाराष्ट्रात हिंदुत्व अधिक आहे.” श्रद्धा वालकर सारख्या असंख्य हिंदू मुली लव्ह जिहादच्या बळी पडल्या. त्यामुळे लव्ह जिहाद रोखण्यासाठी कठोर कायदा आणणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

 

“आदिलशाही असताना पुण्यात गाढवांचा नांगर फिरविला. त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी सोन्याचा नागर फिरविला. त्यामुळे तुम्ही-मी सोन्याच्या कुळात जन्माला आलो. पण संभाजी महाराज हे धर्मवीर नाही असे म्हणणे बरोबर नाही.” असे देसाई म्हणाले.

 

शिवेंद्रसिंह म्हणाले,”हिंदू धर्मातील सर्व जातीपातीचे लोक मोर्चाच्या निमित्ताने आज एकत्र आले आहेत. हिंदू धर्माचे रक्षण झाले पाहिजे, हीच आपली सर्वांची भावना असून देव, देश आणि धर्माच्या रक्षणात कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. आता एकत्र आल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आम्ही कोणाचाही द्वेष करायला एकत्र आलेलो नाहीत. म्हणूनच आम्ही कोणाच्याही विरोधात घोषणा दिल्या नाहीत.”

तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतीस्थळ हे पर्यटनस्थळ म्हणून जाहीर न करता तीर्थस्थळ म्हणून जाहीर करावे, अशी मागणीही शिवेंद्रसिंह यांनी या वेळी केली.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.