पुणे, दि. 18 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुणे
महापालिकेला (PMC)
मिळकत कर, स्थानिक स्वराज्य संस्था कर व बांधकाम विभाग (Construction
department) अशा विभागांमधून सर्वाधिक उत्पन्न (Revenue) प्राप्त होते. 2022-23 या वर्षाचे
वार्षिक अंदाजपत्रक (budget) तयार करताना महापालिका आयुक्त
विक्रम कुमार यांनी बांधकाम परवाना शुल्कातुन 1400 कोटी मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
15 जानेवारी 2023 पर्यंत 1045 कोटी रुपये इतकी म्हणजेच उद्दीष्टाच्या 75% रक्कम बांधकाम परवाना शुल्काच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अजून अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. तोपर्यंत उर्वरीत 25% म्हणजेच 1400 कोटी रुपयांच्या उद्दीष्टापर्यंत पोहोचण्याची शक्यता बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (Till January 15, 2023, an amount of Rs.1045 crore has been accumulated in the treasury of the Municipal Corporation through construction license fee.)
मागील काही वर्षांमध्ये कोरोना तसेच बांधकाम
व्यावसायातील मंदीमुळे महापालिकेस बांधकाम परवानगीतून अपेक्षित उत्पन्न मिळण्यास अडचणी
येत होत्या. परंतु आता कोरोनामुळे निर्माण
झालेल्या संकटातून बांधकाम क्षेत्र पुन्हा एकदा पुर्ववत येत आहे.
कोरोना कालावधीमध्ये बांधकाम क्षेत्राला चालना
देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने बांधकाम प्रिमियम भरण्यासाठी सवलत जाहीर केली
होती. कोरोनाचा इतर व्यावसायांप्रमाणेच बांधकाम व्यावसायाला सर्वाधिक फटका बसला
होता.
एक वर्षाच्या या सवलतीमुळे महापालिकेच्या
बांधकाम विभागाला 2021-22 या आर्थिक वर्षात 2100 कोटी रुपयांचे
उत्पन्न प्राप्त झाले होते. महापालिकेच्या इतिहासामध्ये या विभागाला मिळालेले हे
आतापर्यंतचे सर्वाधिक उत्पन्न आहे.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84