Type Here to Get Search Results !

महाराष्ट्राच्या बदनामीचा ठाकरे कुटुंबाचा कट उद्योगविश्वाने उधळला: माधव भंडारी

 

पुणे, दि. 20 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): उद्योगक्षेत्रात महाराष्ट्राची नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा ठाकरे पितापुत्रांचा कट उद्योगक्षेत्रानेच उधळून लावल्याचे दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रास मिळालेल्या उदंड प्रतिसादावरून स्पष्ट झाले आहे. (The conspiracy of the Thackeray family to defame Maharashtra was foiled by the industry world said madhav bhandari.)

 

परिषदेच्या पहिल्याच सत्रात महाराष्ट्रात 1.37 लाख कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार करून जागतिक उद्योगक्षेत्राने महाराष्ट्राला पसंतीची पावती दिली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विश्वास दाखविला आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

 

गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या परिषदेकडे तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठ फिरवली, तर आदित्य ठाकरे यांनी या परिषदेच्या निमित्ताने स्वित्झर्लंडची पिकनिक पार पाडली होती, असा टोलाही त्यांनी मारला.

महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जात असल्याचा खोटा प्रचार करून उद्धव आणि आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात प्रचाराची राळ उठवली व उद्योगविश्वात महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. मात्र, ठाकरे कुटुंबाचे आरोप धादांत खोटे व केवळ राजकीय वैफल्यातून होत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले. आता दावोस परिषदेत महाराष्ट्रास मिळालेल्या प्रतिसादामुळे ठाकरे पितापुत्रांचा महाराष्ट्रास बदनाम करण्याचा कट उधळला गेला आहे, असा प्रतिहल्ला त्यांनी केला.

 

गेल्या वर्षीच्या परिषदेत आदित्य ठाकरे यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या करारानुसार ते उद्योग राज्यात यावेत यासाठी ठाकरे सरकारने काहीच पाठपुरावा केला नाही, उलट याच काळात महाराष्ट्राची बदनामी करून उद्योगक्षेत्रात महाराष्ट्राविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा कट आखला, असा आरोप करून श्री. भांडारी म्हणाले की, दावोस परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्याच सत्रात विविध उद्योगांकरिता महाराष्ट्राची दारे खुली करून 1.37 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करारही केले आहेत. यातून राज्यात रोजगाराच्या सुमारे एक लाख थेट संधी निर्माण होतील.

 

गेल्या वर्षी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या करारांचा पाठपुरावा करून राज्यात उद्योगांना पोषक वातावरण तयार केले असते, तर राज्याच्या विकासाचे चक्र उलटे फिरले नसते, असे ते म्हणाले. या परिषदेला मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांनी उपस्थित रहावयास हवे होते, पण त्यांनी त्याऐवजी आपल्या मुलास स्वित्झर्लंडची सहल घडवली अशा शब्दांत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची खिल्ली उडविली.

 

शिंदे-फडणवीस सरकारने जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्राविषयीचा विश्वास पुन्हा निर्माण केला आहे. सवलतींची हमी, मंजुरीची वेगवान प्रक्रिया आणि दर्जेदार पायाभूत सुविधा तसेच उद्योगांसमोर अडथळे आणणाऱ्या प्रवृत्तींना वेसण घालण्याची हमी सरकारने दिल्यामुळेच राज्यात पुन्हा उद्योगस्नेही वातावरण तयार झाले आहे. ठाकरे सरकारच्या काळात उद्योगक्षेत्रास लागलेली घरघर आता थांबली असून विकासाची वाटचाल नव्या दमाने सुरू झाल्याने, भविष्यात रोजगार, औद्योगिकरण, पायाभूत सुविधा आणि संपन्न जीवनशैलीचा अनुभव महाराष्ट्रास मिळेल असा विश्वासही श्री. भांडारी यांनी व्यक्त केला.

 

महाराष्ट्रात येऊ घातलेले काही महत्वाचे प्रकल्प-

·         अमेरिकेच्या न्यू एरा क्लीनटेक सोल्यूशनतर्फे चंद्रपूर येथे 20 हजार कोटींचा कोल गसिफिकेशन प्रकल्प (रोजगार 15 हजार)

·         ब्रिटनच्या वरद फेरो अलॉईजचा गडचिरोली जिल्ह्यात चार्मोशी येथे 1250 कोटींचा स्टील प्रकल्प (रोजगार 2 हजार)

·         इस्रालयच्या राजूरी स्टील अँड अलाईजचा चंद्रपूर जिल्ह्यात मूल येथे 600 कोटींचा स्टील प्रकल्प (रोजगार 1 हजार)

·         पोर्तुगालच्या एलाईट प्लास्ट चा पुणे जिल्ह्यात पिंपरी येथे 400 कोटींचा प्लास्टिक ऑटोमोटिव्हज् प्रकल्प (रोजगार दोन हजार)

·         गोगोरो इंजिनिअरिंग व बडवे इंजिनिअरिंगचा 20 हजार कोटींचा प्रकल्प (रोजगार 30 हजार)

·         रुखी फूडसचा 250 कोटींचा पुणे जिल्ह्यात ग्रीनफील्ड अन्नप्रक्रिया प्रकल्प

·         ग्रीन्को रिन्यूएबल एनर्जीचा औरंगाबाद येथे 12 हजार कोटींचा प्रकल्प (रोजगार 6300)

·         जपानच्या निप्रो कॉर्पोरेशनचा पुणे जिल्ह्यात 1650 कोटींचा ग्लास ट्यूबिंग प्रकल्प (रोजगार 2000)

·         इंडस कॅपिटल चा मुंबईत 16 हजार कोटींचा प्रकल्प

·         मुंबई महानगरात स्मार्ट व्हिलेज उभारणाबाबत बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठासमवेत सामंजस्य करार

·         पुणे जिल्ह्यात सुपा औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या अद्ययावतीकरणासंदर्भात जपान बँकेसमवेत वाटाघाटी

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.