Type Here to Get Search Results !

वारजे माळवाडी मध्ये पत्नीवर चाकूने वार करून खून करण्याचा प्रयत्न; पती गजाआड

 

पुणे, दि. 23 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पत्नीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारत पतीने पत्नीचा गळा आवळून तिच्यावर चाकूने वार केला. तसेच तिचा खून करण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (The husband tried to kill his wife by strangulating her throat and stabbing her with a knife, asking her for abusing him. In this case, Warje Malwadi police immediately arrested the woman's husband.)

 

हेमंत सोनवणे (वय 37, रा.विठ्ठलनगर, वारजे माळवाडी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच वारजे माळवाडी पोलिसांनी या महिलेच्या पतीला तत्काळ अटक केली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत सोनवणे हा फिर्यादी महिलेचा पती आहे. पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणातून भांडणे सुरू होती. दरम्यान, 19 जानेवारी 2023 रोजी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास विठ्ठलनगर परिसरात ते राहत असलेल्या ठिकाणी पती हेमंत सोनवणे याने तु मला आई, बहिणीवरून शिवीगाळ का करतेस?’ ‘भांडणं का करतेस?’ असा जाब विचारत फिर्यादीचा गळा दोरीने आवळला. त्यानंतर त्याने त्याच्याकडील चाकू फिर्यादीच्या पाठीत व पोटात मारून महिलेला गंभीर जखमी केले.

 

या घटनेनंतर महिलेला उपचारांसाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हेमंत सोनवणे यास अटक केली.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84  

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.