पुणे, दि. 7 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): वीट कामगाराने कौटुंबिक वादातून पत्नीच्या डोक्यात टिकाव मारून खून केला. याप्रकरणी पतीला न्यायालयाने जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा दिली.
याबाबत वीटभट्टीचालक रमेश बंडू कांबळे (वय 60, रा. कासारअंबोली) यांनी फिर्याद दिली होती. विनोदकुमार केहरसिंग बंजारा (वय 35, सध्या रा. कासार अंबोली, मुळशी, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे शिक्षा झालेल्या पतीचे नाव आहे. त्याने 19 फेब्रुवारी 2017 रोजी कासारअंबोली येथे दुपारी 5 च्या सुमारास पत्नी सुनीतादेवा बंजारा (वय 28) यांचा खून केला होता.
विनोदकुमार आणि त्याची पत्नी सुनीतादेवा हे एका वीटभट्टीवर कामगार होते. घटनेच्या दिवशी दुपारपर्यंत त्यांनी भट्टीवर काम केले. दुपारनंतर त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून भांडण झाले. त्यामुळे विनोदकुमार याने चिडून पत्नीच्या डोक्यात जमीन खांडण्यासाठी वापरण्यात येणारा टिकाव मारला. त्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे विनोदकुमार याने तेथून पळ काढला होता. या प्रकाराची माहिती भट्टी मालकाने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत विनोदकुमारला शोधले व त्याला अटक केली.
विनोदकुमार याच्यावर पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एन. एस. मोरे आणि पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी या गुन्ह्याचा तपास केला तर सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा निकाल दिला. सहायक उपनिरीक्षक बी. बी. कदम, विद्याधर निचित, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84