पुणे, दि. 6 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पुण्यातील श्रीमंत व्यक्तींची फेसबुकवरून माहिती काढून
त्यांना व्हॉट्सअपला कॉल करून अंडरवलर्डमधून बोलत असल्याची धमकी देत खंडणी
मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुणे पोलिसांनी उघडकीस आणला आहे. अवघ्या २४
वर्षीय तरुणाने हा प्रकार केला आहे.
त्याला गुन्हे
शाखेच्या युनिट दोनने थरारक परिस्थितीत पुणे महापालिकेच्या नदीपात्रात पकडले आहे.
प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटटला व त्यांच्या कुटूंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन ३०
लाखांची खंडणीची मागणी केली होती.
किरण रामदास
बिरादार (वय २४) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण हा मुळचा
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो पुण्यात
राहतो. यापूर्वी त्याच्यावर एक विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्याने
गाव सोडले होते. तो गावातून विशाखापट्टणम येथे गेला होता. त्या ठिकाणी एका हॉटेलात
तो काम करत होता. पण, तेही काम सोडून तो पुण्यात दोन महिन्यांपुर्वी आला होता. रेल्वे
स्थानकातील वेटींग रूममध्ये राहत होता. त्याठिकाणी बसूनच त्याला खंडणींची क्लुप्ती
सुचली आणि त्याने यासाठी फेसबुकचा आधार घेतला.
त्याने
पुण्यातील श्रीमंत लोकांची माहिती फेसबुकवरून काढली. त्यात त्याला पाच ते सहा
लोकांचा डेटा मिळाला. त्यात त्यांचे मोबाईल क्रमांक देखील होते. त्याने या
व्यक्तींना व्हॉट्सअपवर मॅसेज टाकले. त्यांना फोन करून ‘मी अंडरवलर्डमधील भाई बोलत
आहे, जीव प्यारा असेल तर खंडणी द्यावी लागेल’ अशा धमक्या देण्यास सुरूवात केली.
परंतु, चार व्यक्तींनी त्याला भीक न घालता ब्लॉक करून टाकले.
मात्र, त्याच्या गळाला
प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटट लागला. भितीपोटी त्यांनी पहिल्याच फोनला घाबरून असे
काही करू नका म्हणत पैसे देण्याची तयारी दाखवली. त्यानंतर त्याने चार्टर्ड अकाउंट
यांना व त्यांच्या पुर्ण कुटूंबाला मारण्याची धमकी देत ३० लाखांची खंडणी मागितली.
गेल्या दहा दिवसांपासून तो त्यांना फोन करत होता. परंतु, संबंधित
चार्टर्ड अकाउंटट यांच्या मित्रांनी त्यांना धीर देत पोलिसांकडे तक्रार करण्यास
सांगितले. त्यानुसार त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
ही कारवाई पोलीस
उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहाय्यक निरीक्षक
विशाल मोहिते, उपनिरीक्षक कांबळे, निखील
जाधव, संजय जाधव, मोहसिन शेख, समीर पटेल, कादीर, तारू तसेच
राख व त्यांच्या पथकाने केली आहे.
गुन्हे शाखेच्या
युनिट दोनकडे तक्रारीवर कारवाई सुरू करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक
क्रांतीकुमार पाटील यांनी संबंधित क्रमांकाचा शोध घेण्यास सुरूवात केली.
तक्रारदारांना त्याला पैसे कुठे घेऊन येण्यास यावे, अशी विचारणी केली. त्याने प्रथम
१ जानेवारी 2023 रोजीच त्यांना पैसे घेऊन येण्यास सांगितले. पण, त्यावेळी त्याला संशय
आल्याने त्याने हा प्लॅन ड्रॉप केला. पुन्हा त्यांना ५ जानेवारी 2023 रोजी पहाटे 4 वाजता पुणे महापालिकेच्या नदीपात्र
परिसरात बोलावले. दुसरीकडे पोलीस त्याच्या मागावरच होते.
स्वत: पोलीस
निरीक्षक क्रांतीकुमार पाटील व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या भागात पहाटे मॉर्निंग
वॉकच्या वेशात सापळा रचला. तरुणाने तक्रारदारांना झाडीत पैशांची बॅग ठेवण्यास
सांगितले व तेथून निघून जा, अशी दमबाजी देखील केली.
तक्रारदारांनी
एकाठिकाणी बॅग ठेवली. पोलीस मॉर्निंग वॉक करत खंडणीखोराची वाट पाहत होते. पण, बराच वेळ कोणी आले
नाही. त्याला संशय येऊ नये म्हणून पोलीस परिसरात रनिंग देखील करू लागले होते.
त्याचवेळी ब्रीजवरून एक जण सतत खाली वाकून पाहत असल्याचे दिसले. त्याचवेळी
पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी या तरुणाला हेरून चहूबाजूंनी वेढा घालून
तरुणाला पकडले आणि खंडणीखोराचा व पोलिसांच्या थराराचा पहाटे समारोप झाला.
पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबूली दिली. त्याची माहिती
घेतल्यानंतर तो कोणी अंडरवलर्ड डॉन किंवा गँगमधील नसल्याचेही समोर आले. पोलिसांनी
त्याच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल
तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84