पुणे, दि.11 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): मैत्रिणीवर चाकूने हल्ला करीत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मित्राला न्यायालयाने जन्मठेप व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा निकाल दिला. दंड न भरल्यास मित्राला अतिरिक्त दोन वर्षे कारावास भोगावा लागेल, असे आदेशात नमूद आहे. 15 जून 2015 रोजी रात्री अडीचच्या सुमारास कोथरूड परिसरातील त्रिमूर्ती कॉलनीत ही घटना घडली होती.
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्वप्नील रघुनाथ कुंभार (वय 28, रा. विजयनगर, ता. कराड) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
स्वप्नील हा व्यावसायिक आहे. तर, मुलगी तिच्या मैत्रीणीसोबत राहत होती. ओळख झाल्यानंतर दोघेही एकमेकांना भेटत होते. भेटीतून त्यांमध्ये चांगली मैत्री झाली होती. काही दिवसांनंतर स्वप्नील तिच्यावर हक्क गाजवू लागला. तिचा मोबाईल तपासणे, तिला इतरांशी बोलण्यास प्रतिबंध करणे, असे प्रकार तो करीत होता. त्यामुळे मुलीने त्याच्याशी बोलणे बंद केले.
घटनेच्या दिवशी स्वप्नील मुलीला भेटण्यासाठी आला होता. उशिरापर्यंत गप्पा मारल्यानंतर त्याने तिला रूमवर जाण्यास रोखले. मात्र मुलीने रूमवर जायचे आहे, असे सांगितल्याने चिडून स्वप्नील याने त्याच्या खिशातून चाकू काढून तिच्यावर 18 वार केले. त्यानंतर तो तेथून पळून गेला.
त्याने केलेल्या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली होती. तरुणी रक्तबंबाळ अवस्थेत रूमवर गेली आणि बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला रुममधील मैत्रिणीने तत्काळ रुग्णालयात दाखल केले व याबाबतची माहिती तिच्या वडिलांना दिली.
कोथरूड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अरुण ओंबासे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी कामकाज पाहिले.
यामध्ये त्यांनी मुलीसह आठ साक्षीदार तपासले. त्यामध्ये, मुलगी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. हल्ल्यामुळे मुलीचे एक मूत्रपिंड पूर्ण फाटल्यामुळे ते काढून टाकावे लागले आहे. तसेच, उपचारांसाठी तिच्या कुटुंबीयांना आर्थिक भार सोसावा लागला. त्यामुळे न्यायालयाने दंडातील रकमेतील 75 हजार रुपये मुलीला द्यावेत, असा युक्तिवाद ॲड. अगरवाल यांनी केला.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84