Type Here to Get Search Results !

वारजे मध्ये मांजामुळे गळा चिरल्याने हॉटेल व्यावसायिक जखमी

 

पुणे, दि. 23 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): रस्त्यावर अर्धवट लटकलेल्या नॉयलॉन मांजाने गळा चिरल्यामुळे एक हॉटेल व्यावसायिक गंभीर जखमी झाला. या संदर्भात निखिल गोपीनाथ लिपाणे (वय 29, रा. दत्तनगर रोड, जांभूळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना वारजे येथील ढोणेवाडाजवळ घडली. (Hotel owner injured after throat slit by manja in Warje)

श्रीकांत लिपाणे (वय 27) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. 22) दुपारी 4:30 वाजता घडली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे चुलतभाऊ श्रीकांत लिपाणे हे दुचाकीवरून त्यांच्या आईसोबत पुनावळे येथून जांभुळवाडीकडे जात होते. त्यावेळी ढोणेवाडा जवळ सर्व्हिस रोडवर अर्धवट लटकलेल्या पतंगाच्या मांजामुळे त्यांचा गळा कापला गेला. हे पाहून लोकांनी तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

काही ठिकाणी रस्त्यांवर झाडाला, विजेच्या खांबास मांजा लटकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दुचाकी वाहनचालकांच्या जिवाला धोका निर्माण होऊन रस्त्यावर लोक जखमी होत असल्याच्या घटना शहरात घडत आहेत.

 

नागरिक आणि पक्षांना गंभीर दुखापत होऊ नये, यासाठी नॉयलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु शहरात होत असलेल्या घटनांवरून पोलिसांच्या आदेशाचा भंग करून नॉयलॉन मांजाची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.

 

दुचाकीवरून जाताना दोन पोलीस कर्मचारी, अग्निशामक दलाचा जवान गंभीर जखमी झाल्याचा प्रकार नुकताच घडला. तसेच, पक्षांच्याही प्राणावर बेतले असतानाच पुन्हा मांजाने हॉटेल व्यावसायिकाचा गळा कापल्याची घटना घडली आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.