पुणे, दि. 24 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): काँग्रेसच्या ओबीसी सेलचे (congress OBC cell) उपाध्यक्ष वसंत
मुंडे (vasant munde) यांनी दादा भुसे (dada bhuse) यांच्यावर फौजदारी
गुन्हा (criminal offense)
दाखल करावा,
अशी मागणी (demand) केली आहे. ही मागणी त्यांनी अंमलबजावणी
संचालनालय (ED), केंद्रीय
गुन्हे अन्वेषणच्या (CBI) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti-Bribery Department) आणि लोकपाल (ombudsman) यांच्याकडे केली आहे.
महाविकास
आघाडी सरकारमधील (Maharashtra Development Front) कृषिमंत्री (Agriculture Minister) आणि विद्यमान
बंदरे,
खनिकर्म मंत्री कृषिमंत्री दादा भुसे
यांनी कृषिमंत्रिपदाच्या कार्यकाळात खात्यातील अधिकाऱ्यांच्या नियमबाह्य बदल्या (transfer) आणि पदोन्नती (promotion) करून भ्रष्टाचार (Corruption) केला आहे, त्यांची चौकशी (inquiry) करून मालमत्ता जप्त (Asset forfeiture) करावी, असे
ते म्हणाले.
मुंडे
यांनी माहिती अधिकाराखाली (right to
information) मागविलेल्या माहितीतून हे उजेडात आल्याचा दावा केला
आहे. मुंडे यांनी कृषी विभागाच्या प्रधान सचिव कार्यालयाकडून (Principal
Secretary office) भुसे यांच्या काळात अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि
पदोन्नतीबाबतची सर्व तपशील (details) माहिती अधिकार
कायद्यांतर्गत मागवून घेतली होती. त्यानुसार ईडी, सीबीआय आणि
लोकायुक्तांकडे चौकशी करण्याची, भुसेंची मालमत्ता जप्त
करण्याची आणि फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
नोव्हेंबर
2019 ते ऑगस्ट 2021 या काळात बदल्या करणे, पदोन्नती करणे, निविष्ठा (खते, बियाणे, औषधे)
परवानगी देणे, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील कामांना मंजुरी
देणे, फार्मर्स प्रोडय़ुसर कंपन्यांना (Farmers
Producer Companies) देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये लाच खाणे,
कृषी विद्यापीठातील बांधकामांमध्ये टक्केवारी घेणे, कृषी विभागाच्या अन्य योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप (Accusation) मुंडे यांनी केला आहे.
“आपल्या
देशात लोकशाही आहे. लोकशाहीने नागरिकांना राजकीय नेत्यांच्या चौकशीची मागणी
करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे माझ्या चौकशीच्या मागणीबाबत मला काही मत व्यक्त
करायचे नाही.” असे तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे म्हणाले.
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व
सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा.
याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या
आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली
देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84