Type Here to Get Search Results !

आर्थिक मदतीचे आमिष दाखवून केले जात होते धर्मांतर; १४ जणांवर गुन्हा दाखल

 


(In Markal village, religion conversion was done by showing the lure of financial help.)

पुणे, दि. 19 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): आळंदी व शहरालगतच्या गावांमध्ये सध्या धर्मांतरासाठी नागरिकांना जबरदस्ती केल्याचे समोर येत आहे. दहा दिवसांपूर्वी आळंदी परिसरात येशूचे रक्त म्हणून द्राक्षाचं लाल सरबत पाजून धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याबाबतचे वृत्त ‘चेकमेट टाईम्स’ने प्रकाशित केले होते. अशाचप्रकारची अजून एक घटना समोर आली आहे.

 

आता पुन्हा एकदा आर्थिक मदतीचे आमिष दाखवून धर्मांतर करत असल्याचा प्रकार रविवारी (दि. 16 जानेवारी 2023) मरकळ गावात घडला आहे. विशेष म्हणजे ज्या धर्मांतरबंदी कायद्यासाठी शनिवारी (दि. 15 जनेवारी 2023) आळंदीत विराट जनमोर्चा काढण्यात आला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी लगतच्या गावांमध्ये धर्मांतरासाठी प्रयत्न केले जात असल्याचे समोर आले.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे फिर्यादी यांच्या गावातील लोकांच्या घरासमोर जाऊन तुम्ही बायबल वाचता का, चर्चमध्ये या, आम्ही तुम्हाला धंद्याला आर्थिक मदत करू असे आमिष दाखवून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. याबाबत प्रसाद भाऊसाहेब साळुंखे (वय 25 रा. मरकळ) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान याबाबतचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात प्रदीप मधुकर वाघमारे (चऱ्होली), प्रशांत मधुकर वाघमारे (वय 30), रोनक शैलेश शिंदे (वय 18 रा.भोसरी), अशोक मुकेश पांढरे (वय 19 भोसरी), मुकेश जयकुमार विश्वकर्मा (वय 25 रा.भोसरी), लक्ष्मण श्रीरंग नायडू (वय 35 रा.भोसरी), म्यूंगी व्युयुंग वुन (वय 38 रा. भोसरी), ज्युईल वोमन युन (वय 36), ईशा भाऊसाहेब साळवे (वय 19) या तीन महिला व एक अल्पवयीन मुलगी अशा एकूण चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.