Type Here to Get Search Results !

ती हेडफोन लावून चालत होती, तेवढ्यात भरधाव वेगात रेल्वे आली

 

पुणे, दि. 19 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): कानात हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. कानात हेडफोन असल्याने ट्रेनचा आवाज तरुणीला ऐकू आला नाही. यामुळे तरुणी रेल्वेखाली चिरडली गेली. ही घटना नागपूरमध्ये घडली. आरती मदन गुरव असे मयत तरुणीचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास डोंगरगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ घडली. आज सकाळी टाकळघाटवरून गुमगाव रेल्वे स्थानकाजवळ एसटीने आली. यानंतर पायदळ रेल्वे स्थानकावर रेल्वे फाटक ओलांडून जात होती. यावेळी आरती मोबाईलवर हेडफोन लावून बोलत चालली होती.

 

याचदरम्यान त्या ट्रॅकवर भरधाव वेगात ट्रेन येत होती. आजूबाजूच्या लोकांनी तिला मोठमोठ्याने आवाज दिला. मात्र हेडफोन कानात असल्याने तिला कुठलाही आवाज आला नाही. भरधाव आलेल्या पुणे-नागपूर रेल्वेखाली चिरडून तिचा मृत्यू झाला. इतकेच नाही रेल्वेने तिला 50 फूट पर्यंत फरफटत नेले. घटनास्थळी गर्दी मोठ्या प्रमाणात झाली. हिंगणा पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली.

 

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ पथकासह दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

मयत विद्यार्थिनी आरती गुरव ही मूळची भंडारा जिल्ह्यातील सातोना या गावची निवासी आहे. हिंगणा तालुक्यातील टाकळघाट येथे मावशीकडे ती वास्तव्याला होती. आरती गुरव डोंगरगाव जवळील वैनगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयात बीई प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.