Type Here to Get Search Results !

या महिलेनं नग्नावस्थेत गाडी चालवून सगळीच मर्यादा ओलांडली; पोलिसांशीही केले गैरवर्तन

 

पुणे, दि. 5 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सोशल मीडियावरील काही व्हिडीओ हे लोकांचे झोप उडवणारे असतात. तर काही व्हिडीओ हे मनोरंजक असतात. सध्या असाच एक विचित्र व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ बाईक चालवणाऱ्या महिलेचा आहे. यात महिलेनं एक गोष्ट केली, जे करण्याचा विचार कोणीही करु शकणार नाही.

या महिलेनं विनाकपडे बाईक चालवली. या महिलेनं विनाकपडे गाडी चालवून सगळीच मर्यादा ओलांडली. ही महिला कपड्यांशिवाय स्कूटी घेऊन रस्त्याच्या मधोमध धावत होती.

वास्तविक, ही घटना ब्राझीलच्या दक्षिण-पूर्व राज्यातील एस्पिरिटो सँटो येथील आहे. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, राजधानी विला वेल्हाहून व्हिटोरियाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. रिपोर्टनुसार, जेव्हा काही लोकांनी महिलेला पाहिले तेव्हा त्यांना काय करावे हे समजत नव्हते कारण ती महिला तिची स्कूटी घेऊन खूप वेगाने धावत होती.

यानंतर काही लोकांनी महिलेला चौकाचौकात पाहिल्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी महिलेचा त्यांच्या कारमधून पाठलाग केला आणि तिला पकडले. आधी पोलिसांनी महिलेला रोखण्याचा प्रयत्न केला असता महिलेने पोलिसांना धक्काबुक्की करून तेथून पळ काढला. यानंतर महिलेला पुन्हा पकडण्यात आले, यादरम्यान महिलेला काही कपडेही घालण्यात आले.

परंतु महिलेने असे का केले याची पुष्टी होऊ शकली नसल्याचे सांगण्यात येत आहे. ही महिला कोणत्या तरी मानसिक स्थितीत असल्याचं देखील म्हटलं जात आहे. ती कोणत्यातरी गोष्टीसाठी निदर्शन करत होती, असं देखील सांगितलं जातं.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes      

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes   

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84     


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.