Type Here to Get Search Results !

३१ डिसेंबरच्या रात्री उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीतही दोन गटात तुंबळ हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

 

पुणे, दि. 3 जानेवारी २०२३ (चेकमेट टाईम्स): ३१ डिसेंबर २०२२ ची रात्र आणि १ जानेवारी २०२३ च्या स्वागताला वारजे मध्ये उघडकीस आलेल्या खुनाच्या प्रकाराबरोबरच उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत देखील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी मोठी घटना घडली असून, परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे प्राथमिक दर्शनी उत्तमनगर मध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित असल्याचे दिसत असले तरी आगामी काळात शांतता राहिलंच याबाबत जाणकार साशंकता व्यक्त करू लागले आहेत.

 

यामध्ये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि.३१ डिसेंबर २०२२ च्या रात्री साडेअकराच्या सुमारास उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीतील धोत्रे बिल्डींग समोरील विहिरी जवळच्या मोकळ्या जागेत, मासे आळी, उत्तमनगर आणि आयप्पा मंदिराजवळील लॉड्री दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर लघुशंकेसाठी थांबलेल्या गौरव धावडे (वय.२२ रा.बालाजी रेसिडेन्सी, उत्तमनगर, पुणे) यास ९ जणांनी मिळून, शिवीगाळ करत, लाथा बुक्क्यांनी मारहाण करत, धावडे याला जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात कोयता मारून गंभीर जखमी केले. यावेळी हल्लेखोरांनी कोयते हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी धावडे हा नातेवाईकांच्या घरात आश्रयाला गेल्याने थोडक्यात बचावला.

 

याबाबत कार्तिक शर्मा (वय.२१), मंगेश ठाकूर (वय.२३), किशोर अडगळे (वय.२१), गुण्या उर्फ नीरज हिनोटीया (वय.१९) आणि सोहेल सय्यद (वय.२२, सर्वजण रा.उत्तमनगर, कोंढवे धावडे, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांचे साथीदार प्रसाद दांगट, लड्डु परदेशी, झप्या ऊर्फ गौस परदेशी, निखिल कंधारे, दाद्या सांळुखे यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केले असून मंगेश ठाकूर, किशोर अडगळे, गुण्या हिनोटिया हे पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

 

तर कार्तिक शर्मा (वय.२१ वर्ष, रा.मासे आळी, उत्तमनगर, पुणे) याच्या फिर्यादीवरून गौरव गणेश धावडे आणि प्रसाद नवनाथ कोळी (वय.२२ वर्ष, उत्तमनगर, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांनाही अटक करण्यात आली आहे. यातील फिर्यादी कार्तिक शर्मा हा त्याच्या राहत्या घरा समोर उभा असताना, यातील नमुद आरोपी गणेश धावडे आणि  प्रसाद कोळी यांनी "तु काय मोठा भाई झालास का, डोळे फाडुन काय बघतोस, तुझ्या एरीयात आलो", असे म्हणुन संगनमताने कार्तिक शर्मा याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने, त्याला शिवीगाळ दमदाटी करून, रस्त्यावरील फरशी उचलुन त्याच्या डोक्यात मारून, त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याबाबत कार्तिक शर्मा याच्याकडून तक्रार देण्यात आली आहे.

 

दोन्ही घटना वर्ष अखेरीच्या शेवटच्या तासात घडल्या, यावेळी अनेकजण या भागातून खडकवासला, पानशेत, वरसगाव धरण आणि सिंहगड खोऱ्यातील हॉटेल्सकडे जात असताना घटना घडल्याने मुख्य रस्त्यावर काही अंशी पळापळ होऊन, भीतीचे वातावरण पसरल्याने, या भागात आलेल्या पर्यटकांमध्ये देखील भीतीचे सावट पसरले होते.  पर्यायी या घटनेचे पडसाद या भागातील पर्यटनावर पडणार असून, सुदैवाने पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी गंभीर घटना घडण्यापासून थोडक्यात टळली. तर वर्षाची सुरुवात अशा घटनेमुळे झाल्याने भविष्यात उत्तमनगर पोलिसांना हद्दीतील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागणार की काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

 

दोन गटात झालेली ही भांडणे कशामुळे झाली? यामागे पूर्वीची काही भांडणे, खुन्नस अथवा टोळीयुद्ध आहे का? यात आणखीन कोणाचा सहभाग होता? कोण कोण फरार आहे? याचा पुढील तपास उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे करत आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com/

आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.