Type Here to Get Search Results !

“भाई” म्हणून सन्मान देत नसल्याने एकावर प्राणघातक हल्ला; भाई गजाआड

 


पुणे, दि. 7 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): ‘भाई’ न म्हटल्याच्या कारणातून येरवडा भागात एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी एका सराइतासह तिघांना अटक करण्यात आली.

याप्रकरणी प्रफुल्ल उर्फ कान्या सोनवणे (वय 30 रा. नवी खडकी), संकेत मोरे उर्फ मेड्या, सोनू मोरे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा साथीदार महेश सुरेश पवार पसार झाला आहे. संतोष पंडीत साळवे (वय 36, रा. यशवंतनगर, येरवडा) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष साळवे रात्री 8:15 च्या सुमारास व्यायाम शाळेतून घरी निघाले होते. त्यावेळी ओळखीतील प्रफुल्ल त्यांना भेटला. संतोषने ‘काय पप्या काय चालले आहे’, असे विचारले. 'तुला माज आला आहे का, तुला भाई बोलता येत नाही का', असे आरोपी संकेत मोरे त्यांना म्हणाला.

त्यानंतर आरोपी संकेतने संतोषच्या डोक्यात गज मारत मोबाइल फोडला. त्या वेळी रहिवाशांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी परिसरात दहशत माजविली.

पोलीस उपनिरीक्षक शेलार याबाबत अधिक तपास करत आहेत.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com 

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.