Type Here to Get Search Results !

लॉज मध्ये सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; गिऱ्हाईकांसह चालक गजाआड

 

पुणे, दि. 4 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): दिघी येथील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. येथे सुरु असलेल्या वैश्या व्यवसायाबाबत सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या पथकाला माहिती मिळाली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, दिघी येथील अभिषेक लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू होता. त्यानुसार, शुक्रवारी सायंकाळी 7:30 च्या सुमारास पोलिसांनी लॉजवर छापा मारून कारवाई केली. लॉज मालक, मॅनेजर हे तीन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होते. या छाप्यामध्ये दोन ग्राहकांनादेखील अटक करण्यात आली आहे.

 

प्रेमकुमार सुखदेव सोळंके (19, मूळ रा. बीड), शिरीष शंकर काळे (40, रा. विश्रांतवाडी, पुणे), ग्राहक वामन तुळशीदास सोळंके (42, रा. आळंदी), सुरेश भिकू निंबाळकर (60, रा. दिघी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह गौरव चौहान (24, रा. बोपखेल) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक जिजाराम कारभळ यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (दि. 30 डिसेंबर 2022) सायंकाळी याबाबत कारवाई करण्यात आली.

 

एकजण घटनास्थळावरून पळून गेला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच, तीन पीडित महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !

 

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes  

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/  

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes  

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n  

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes     

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84    


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.