Type Here to Get Search Results !

पतंग उडविताना कोणाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी - मंजुश्री खर्डेकर यांचे आवाहन

 

पुणे, दि. 14 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): संक्रांती (sankrant) पासून उत्तरायण सुरु होते आणि सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या काळात मोकळ्या हवेत जावे, जास्तीत जास्त सूर्यकिरण शरीरावर पडावेत या उद्देशाने पतंग (patang) उडविण्याची परंपरा (tradition) असल्याचे माजी नगरसेविका आणि शिक्षण मंडळ अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर (manjushri khardekar) म्हणाल्या.

 

मुकुलमाधव फाउंडेशन (mukulmadhav foundation) आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन (creative foundation) च्या वतीने मोफत पंतग व मांजा वाटपाच्या उपक्रमात त्या बोलत होत्या. एरंडवणे परिसरातील दहा चाळ, पंडित जवाहरलाल नेहरू वसाहत, राजश्री शाहू वसाहत, सात चाळ अश्या विविध वस्त्यातील मुलांना पतंग (patang) उडविण्याचा निर्भेळ आनंद मिळावा आणि त्यांना सूर्यस्नान घडावे यासाठी हा उपक्रम करत असल्याचे मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी, योगेश रोकडे आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. यावेळी सौ. कल्याणी खर्डेकर, श्री.राजेंद्र येडे, श्री.सुनील होलबेले, संगीताताई आधवडे,संगीताताई वांद्रे,कोंडेताई, नागरिक व मुलं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आपल्याला सणाचा आनंद लुटायचा आहे पण त्याचा कोणाला त्रास होऊ नये याची देखील काळजी घ्यायची आहे असे मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या. चिनी मांज्यामुळे पक्ष्यांनाच नव्हे तर सामान्य नागरिकांना ही इजा झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत त्यामुळे पतंग उडविताना काळजी घ्यावी व रस्त्यावर पतंग न उडविता मोकळ्या जागेत (free space) उडवावेत असे आवाहन ही मंजुश्री खर्डेकर यांनी केले आहे.

पतंग वाटपाच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे लहान मुलं प्रचंड आनंदली होती व त्यांचा उत्साह ओसंडून वहात होता.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com     

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.