Type Here to Get Search Results !

१९९५ मध्ये केलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी २०२३ मध्ये गजाआड

 


पुणे, दि. 19 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या करून फरार असलेला आरोपी पती तब्बल 28 वर्षांनी पोलिसांच्या हाती लागला. ही घटना पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथे घडली आहे. (The accused husband, who was absconding after killing his wife due to suspicion of character, was caught by the police after 28 years.)

 

मिळालेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारी 1995ला सुशीला कांबळे यांची पिंपरी चिंचवडमध्ये हत्या झाली होती. पती रामा कांबळे हत्या करुन पसार झाला. मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील कोळनूर पांढरी या गावचा तो होता. तिथे पुणे पोलीस बरेच दिवस सापळा रचून बसले होते. पण तो पोलिसांच्या हाती लागलाच नाही. काही महिन्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाकडे दुर्लक्ष झालं.

 

येत्या 1 फेब्रुवारीला या हत्येला 28 वर्ष पूर्ण होणार होती. दरम्यान महेश कांबळे नामक इसमावर 354 चा गुन्हा दाखल झाला आणि तो रामा कांबळेच्या कोळनूर पांढरी गावचा निघाला. त्यामुळे महेशच्या शोधात असणाऱ्या पोलिसांना रामा ही फरार असल्याचं लक्षात आलं. तेंव्हा सुशीला कांबळेच्या हत्येच्या तपासाची चक्र पुन्हा फिरली.

 

गावात चौकशी केली असता, रामाने ओळख लपवण्यासाठी नाव बदलल्याची माहिती समोर आली. तो गावात कधीतरी येत असतो आणि त्याने सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील पालापूर गावातील महिलेशी दुसरा विवाह केल्याची तुटपुंजी खबर पोलिसांच्या हाती लागली. याच माहितीच्या बळावर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे पोलीस पालापूरमध्ये पोहोचले, तिथे गावकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. त्यात रामा कांबळे नव्हे तर राम बनसोडे नावाने आरोपी वावरत असून त्याचं सध्याचं वय हे 66 वर्ष असल्याचं समोर आलं. पण रामा तिथेही राहत नसून राज्यातील वेगवेगळ्या गावात जाऊन मजुरी करत असल्याची माहिती हाती लागली.

 

या सगळ्यानंतर विशेष म्हणजे रामा सध्या पुणे जिल्ह्यातच असल्याचं आणि मावळ तालुक्यातील वीट भट्टीवर काम करत असल्याचं पोलिसांना समजलं. मग पोलिसांनी तातडीने तिथे पथक पाठवलं. अनेक वीट भट्ट्यांवर जाऊन पाहिलं असता उर्से गावातील एका वीट भट्टीवर रामा बनसोडे आढळला. आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र ही रामा बनसोडे नावाचं असल्याने आणि अठ्ठावीस वर्षानंतर चेहऱ्यात झालेला बदल यामुळे ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. मग शेवटी नातेवाईकांना बोलावून ओळख पटवून पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेने रामा कांबळेच्या मुसक्या आवळल्या.

 

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com      

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.