पुणे, दि. 4 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): पाषाण तलावात रामनदीद्वारे वरच्या भागातून येणारे घाण पाणी व जलपर्णीची वारंवार होणारी वाढ यामुळे पाषाण, सुतारवाडी परिसरात दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे तलावाशेजारीच असलेल्या सुतारवाडी परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असून ते त्रस्त झाले आहेत. पुणे शहरातील एकेकाळी महत्त्वाचा असलेला पाषाण तलाव आज घाण पाणी व जलपर्णीच्या विळख्यात सापडल्याने तलावाची दुर्दशा झाली आहे. रामनदी पात्रात सोडलेल्या घाण पाण्यामुळे तलावाचे सौंदर्य लयाला जात आहे.
जलपर्णीच्या अनियंत्रित वाढीमुळे तलावात हिरव्या रंगाचे आच्छादन तयार झाले असून, पर्यावरणासह मानवी आरोग्यासाठी हे हानिकारक आहे. तलावात जमा होणारे हे पाणी पुढे बाणेर, औंध मार्गे मुळा नदीच्या पात्रात मिसळत असल्याने प्रदुषणात भर पडत आहे. मागील काही वर्षांपासून तलावात जलपर्णीच्या वाढीमुळे छोटे जीव व मासे यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात विदेशी पक्षांचा संचार असलेल्या या तलावात प्रदुषण वाढत चालल्याने व खाद्य कमी झाल्याने त्यांनीही इकडे पाठ फिरवली आहे. एकेकाळी पर्यटनासाठी महत्त्वाचे ठिकाण व पक्ष्यांचा अधिवास असलेला पाषाण तलाव दुर्गंधी व घाणीचे केंद्र बनले आहे.
रामनदीतून तलावात येणाऱ्या सांडपाण्यावर पालिकेने नियंत्रण आणणे गरजेचे आहे. परंतु यावर काहीच उपाययोजना होत नसल्याने ही समस्या कायम आहे. एकीकडे पालिकेकडून जलपर्णीच्या नियंत्रणासाठी कर्मचा-यांच्याकडून सफाई केली जाते परंतु हे प्रयत्न अपुरे पडत आहेत. महत्वाचे म्हणजे जलपर्णीच्या वाढीस कारणीभूत ठरणारे व नदीत थेट सांडपाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जावी. तसेच पालिकेच्या माध्यमातून एखादा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारून ही समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे. कोट्यावधी रुपयाचा खर्च जलपर्णी काढण्यासाठी केला जातो त्याऐवजी वरील परिसरात एखादा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला तर ही समस्या कायमस्वरूपी सुटेल अशी सुचनाही नागरिकांनी केली आहे.
या परिसरातीलच रहिवासी महेश भिमराव सुतार म्हणाले,”तलाव स्वच्छ झाल्यावर सातत्याने वापरात राहिल यासाठी बोटींग सुरू करावे जेणेकरुन तलावात घाणही होणार नाही व स्थानिक युवकांना रोजगारही मिळेल. येणाऱ्या उत्पन्नातुन तलावाची स्वच्छतेचा खर्च सुद्धा जाईल. तसेच पुर्वीप्रमाणे पक्षांचे थवे पुन्हा एकदा तलावाकडे येतील व यामुळे तलावाच्या वैभवात भर पडेल.”
यावर औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता (ड्रेनेज) बसवराज कलशेट्टी म्हणाले,”विधाते वस्ती ते पाषाण तलावापासून वरच्या बाजूला पाचशे मीटर पर्यंत अंदाजे चार किलो मीटरची नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे. यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवला आहे. यामुळे नदीत येणारे घाण पाणी थांबले जाईल.”
वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा !
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84