पुणे, दि. 13 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): लॉटरी लागल्याचं खोटंनाटं सांगून महिलांना आणि वृद्धांना लुटणारा एक ठग सिंहगड पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून साधारण 10 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने त्यांच्याकडून जप्त करण्यात आले.
आफताब उर्फ साजिद अहमद शेख (रा.
हैदराबाद) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे
शहरात दहा ठिकाणी दहा गुन्ह्यात एकच "मोडस" (प्रकार) आरोपीने वापरली
आहे. तुमच्या नवऱ्याला बक्षीस लागला आहे, त्यासाठी पैसे द्या
असे कारण असो किंवा तुमच्या मुलाला लॉटरी लागली आहे, त्यासाठी
पैसे लागतील. तुमचा लकी ड्रॉ मध्ये नंबर लागला आहे. तुम्ही येऊन भेटा असे वेगवेगळे
आमिष दाखवून अहमद हा ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जाळ्यात ओढायचा.
पुण्यात ज्येष्ठ नागरिकांना
ऑनलाइन लॉटरी लागल्याचे सांगून फसवणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. वृध्द महिलांना
तुमच्या मुलाला लॉटरी लागली आहे आणि तुमच्यासाठी गिफ्ट आहे, असे
आमिष दाखवायचा.
वयाचा फायदा घेत तो या ज्येष्ठ
नागरिकांना लुटण्याच्या उद्देशाने शांत जागेत नेऊन त्यांच्या अंगावर असलेले दागिने
लुटायचा. आरोपीकडून 15 तोळे सोनं आणि एक बुलेट जप्त करण्यात आले आहे.
अहमदने पुण्यात 9 पोलीस स्टेशनच्या हद्दीत असा गुन्हा
केल्याचं निष्पन्न झालं आहे.
आरोपीकडून पोलिसांनी 9 लाख
62 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, 1 लाख रुपये किंमतीची बुलेट मोटार बाईक असा 10 लाख
रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करीत
आहेत.
वरील वृत्त खाली लिंक
जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल
तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल
मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!
आम्हाला वेबपोर्टल’वर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com
आम्हाला फेसबुक’वर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes
आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आम्हाला इंस्टाग्राम’वर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/
आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times
आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes
आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes
आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा:https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n
आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes
आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84