Type Here to Get Search Results !

लढ बाप्पू; पुणे शहर पोलीस आयुक्तांनी लढवय्या पोलिसांचा केला सन्मान, लढण्यासाठी दिली प्रेरणा

 

पुणे, दि. 9 जानेवारी 2023 (चेकमेट टाईम्स): सिंहगड महाविद्यालय परिसरातील खाऊ गल्लीत कोयते उगारून दहशत माजविण्याची घटना नुकतीच घडली. येथे कोयते उगारून धुमाकूळ घालत दहशत माजवित तोडफोड करणार्‍या गुंडांना भररस्त्यात पोलिसी खाक्या दाखवत चोप देणार्‍या दोन पोलीस कर्मचार्‍यांचा पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पोलीस आयुक्तांकडून पोलीस कर्मचारी अक्षय इंगवले आणि धनंजय पाटील यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अक्षय इंगवले आणि धनंजय पाटील त्या वेळी गस्त घालत होते. सराइतांनी कोयते उगारून खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्यांची तोडफोड केली. खाऊ गल्लीतील हॉटेलमध्ये शिरून दहशत माजविली. वाहनचालक तसेच नागरिकांवर कोयते उगारले होते. सराइतांनी एका तरुणावर कोयत्याने वार केला. या घटनेची माहिती मिळताच गस्त घालणारे पोलीस कर्मचारी इंगवले आणि पाटील यांनी सराइतांना पाठलाग करून पकडले होते.

याबाबतचा व्हिडीओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून याचे कौतुक झाले होते. पोलीस आयुक्तालयात पार पडलेल्या बैठकीत इंगवले आणि पाटील यांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी इंगवले आणि पाटील यांना प्रत्येकी 25 हजारांचे रोख बक्षीस जाहीर केले.

सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर, राजेंद्र डहाळे, रंजनकुमार शर्मा आदी उपस्थित होते.

वरील वृत्त खाली लिंक जोडलेल्या आमच्या सर्व सोशल मिडिया साईटवर उपलब्ध आहे. माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या 9730307227 या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला खाली देण्यात आलेल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म’वर फॉलो करा...!

आम्हाला वेबपोर्टलवर फॉलो करा: https://www.checkmatetimes.com 

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा: https://www.facebook.com/checkmatetimes     

आमचे युट्युब सबस्क्राईब करा: https://www.youtube.com/c/CheckmateTimes   

आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा: https://www.instagram.com/checkmate_times/   

आम्हाला ट्विटर’’वर फॉलो करा: https://twitter.com/checkmate_times  

आम्हाला डेली हंट’’वर फॉलो करा: https://m.dailyhunt.in/profile/CheckmateTimes   

आमचे टेलिग्राम सबस्क्राईब करा: https://t.me/CheckmateTimes  

आम्हाला शेअर चॅट’’वर फॉलो करा: https://sharechat.com/profile/checkmatetimes?d=n   

आम्हाला मोज’’वर फॉलो करा: https://mojapp.in/@checkmatetimes      

आम्हाला जोश’’वर फॉलो करा: https://share.myjosh.in/profile/d0908f18-40fe-4e4d-87be-84ffd6ecd6d4?u=0xffe7b0c455ceaa84      


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.